निमित्त होते, ऑल आयकॉनिक सिनियर सिटीझन्स असोसिएशन (आएस्का) या ज्येष्ठ नागरिकांच्या मानसिक, शारीरिक आरोग्य, सुरक्षितता आणि आनंदासाठी कार्यरत असणाऱ्या सेवाभावी संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या संगीतकार एस. डी. बर्मन यांनी संगीतबद्ध केलेल्या रचनांच्या मैफिलीचे. कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात झालेल्या या कार्यक्रमाला आएस्का संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष शकीला शेख, प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक रणजीत नाईकनवरे, पूना गेस्ट हाउसचे संचालक डॉ. किशोर सरपोतदार, स्नेहकुंज संस्थेच्या मृणाल राजहंस, अर्थ ट्रॅव्हल्सचे आनंद दवे, प्रभाकर फाऊंडशनचे सचिव विवेक बुचडे, जयदीप भगत, स्वच्छंद संस्थेचे रवींद्र शाळू, राजकुमार सुराणा, सदस्य सुनीला कविटकर, सुहास घोडके आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
सुन मेरे बंधु रे… अशा शीर्षकाची बर्मनदांच्या संगीतरचनांची मैफल गायक रवींद्र शाळू, गायिका कल्याणी देशपांडे, पल्लवी आनदेव, प्रिती पेठकर यांनी उत्तरोत्तर रंगतदार केली. अनेक गीतांना रसिकांनी वन्समोअर दिले. भंडारे यांनी वाद्यवृंद संयोजन केले. रोहित जाधव (तबला, ढोलक), संजय खाडे (ऑक्टोपॅड), शैलेश देशपांडे (बासरी, सॅक्सोफोन), नितीन कुलकर्णी (गिटार) या वादकांनी पूरक साथ केली. रात का समा, दिल का भॅवर करे पुकार, अब तो है तुमसे, ना तुम हमे जानो, पिया बिना, शोखियों मे घोला जाए, अब के सजन सावन मे, तेरे मेरे मिलन की ये रैना, मोसे छल किये जाय, लुटे कौयी मन का नगर, पिया तोसे नैना लागे, आज फिर जीने की तमन्ना है, सुन मेरे बंधु रे, रूप तेरा मस्ताना, रुला के गया सपना मेरा, पूछो ना कैसे मैने रैन बिताई, मेघा छाए आधी रात…अशा अजरामर गाण्यांनी रसिकांनी भरभरून आनंद दिला आणि स्मृतिरम्य काळाची सफर घडवली. सचिन देव बर्मन यांचे सांगीतिक कर्तृत्व निवेदनातून सिद्धार्थ बेंद्रे यांनी रसिकांसमोर उलगडले.
प्रति,
मा. संपादक
ऑल आयकॉनिक सिनियर सिटीझन्स असोसिएशन (आएस्का)तर्फे संगीतकार एस. डी. बर्मन यांनी संगीतबद्ध केलेल्या रचनांच्या मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते. या वृत्तास प्रसिद्धी द्यावी ही विनंती. कार्यक्रम विनामूल्य होता.
रवींद्र शाळू, संयोजक
प्रसिद्धी माध्यम समन्वयक : पाध्ये मीडिया सर्व्हिसेस, मो. ९९२२९०७८०१