पी एम पी एम एल च्या सेवकांचे कार्य कौतुकास्पद – संदीप खर्डेकर.

स्वारगेट डेपोतील दत्त प्रतिष्ठान ला स्पीकर सेट भेट.

अनेक वेळा पीएमपीएमएलच्या कर्मचाऱ्यांना सामान्य नागरिकांकडून बोल लावले जातात पण पीएमपीएमएल चे चालक, वाहक असोत किंवा व्हेईकल दुरुस्ती डेपोतील कर्मचारी. हे सर्वजण विपरीत परिस्थितीत काम करतात आणि ऊन, पाऊस, थंडीत पुणेकरांना सेवा देतात हे कौतुकास्पद असल्याचे क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर म्हणाले.
शहरातील वाहतूक कोंडी, अरुंद गल्ल्या अश्या स्थितीत पुणेकर साधी दुचाकी चालविताना अनुभव घेतात, अश्या परिस्थितीत येवढे मोठे वाहन चालविणे किती अवघड असते याची कल्पना केलेली बरी. जुनी झालेली वाहने दुरुस्त करून त्यांना पुन्हा रस्त्यावर आणण्याचे काम हे कर्मचारी करतात असेही ते म्हणाले.
पीएमपीएमएल च्या स्वारगेट व्हेईकल डेपोतील कर्मचाऱ्यांच्या दत्त प्रतिष्ठान ला क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या वतीने स्पीकर सेट भेट देण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, विकास जाधव, शैलेश जगताप, गणेश परदेशी,श्री. चिकणे, उमेश दाभेकर इ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
या ठिकाणी आपण जी मदत मागाल ती आम्ही देऊ करू असं क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या विश्वस्त मंजुश्री खर्डेकर यांनी जाहीर केले.
आपला,
संदीप खर्डेकर.
अध्यक्ष,
क्रिएटिव्ह फाउंडेशन.
मो – 9850999995

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button