सार्वजनिक उत्सव मंडळात महिलांना अधिकार पदं दिल्यास सकारात्मक बदल घडतील – संदीप खर्डेकर यांचे मत.

सार्वजनिक उत्सव साजऱ्या करणाऱ्या मंडळात महिलांना अधिकार पदं दिल्यास सकारात्मक बदल घडतील असे मत क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी व्यक्त केले. गणेशोत्सव, नवरात्रौत्सव, महापुरुषांच्या जयंती, पुण्यतिथी या सारखे उत्सव साजरे करणाऱ्या संस्थांमध्ये महिलांनी निर्णय घेतल्यास त्या ध्वनी प्रदूषण, पर्यावरण रक्षण, उत्सवातील पावित्र्य, सार्वजनिक सभ्यता याबाबत सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेऊन निर्णय घेतील आणि उत्सव अधिक सर्वसमावेशक व लोकप्रिय करतील असा विश्वास वाटतो असेही खर्डेकर म्हणाले. विविध मंडळाना क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि फिनोलेक्स पाईप्स अँड फिटिंग्स च्या वतीने उपयुक्त साहित्य भेट देण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.यावेळी क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या विश्वस्त व नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी नवरात्रात उत्तम पद्धतीने इतरांना त्रास होऊ न देता भोंडला, देवीची मिरवणूक,मनोरंजनात्मक कार्यक्रम साजरे करण्यात महिलांचा लक्षणीय सहभाग असल्याचे निरीक्षण नोंदविले.
त्यांच्या हस्ते श्री स्वामी समर्थ आर के अकॅडमी भजनी मंडळास स्पीकर भेट देण्यात आला यावेळी सौ. मीनाक्षी भेगडे,सौ. उज्ज्वला भिगे ( इंदापूरकर ), सौ. शैला थिटे, सौ. माधवी जोशी, सौ.संजीवनी इनामदार उपस्थित होत्या. तर छ.संभाजी मित्र मंडळ भालेकर चाळ मंडळास भेट देताना संतोषभाऊ लांडे,मनीषाताई जोरी,संगीताताई दुधाणे,शकुंतला साबळे,आशाताई यादव,सुशीला लोहकरे,पुष्पा झोरे, बायाबाई अनिवसे, पुष्पा वाळंज,ज्योती कराळे, गौरी जोरी,ओंकार खरात,देवदत्त जोरी, शाश्वत जोरी,विराज चंदनशिवे, आशुतोष पवळे,मयूर खरात, श्रवण जोरी,इ मान्यवर उपस्थित होते.
तर प्लॉट नं 15 खिलारेवाडी नदीपात्र येथील नवरंग नवरात्रौत्सव मंडळास कपाट भेट देताना सूरज अभंगे, वृंदा अभंगे, अनिकेत मछले,पुष्पा तामचीकर, सुधा अभंगे इ उपस्थित होते.
अखिल सदाशिव पेठ नवरात्र उत्सव मंडळास ही स्पीकर व कपाट भेट देण्यात आले. यावेळी प्रकाशराव गायकवाड, अनिलराव यनपुरे, हर्षद शेलार, राहुल पायगुडे, सौरभ गायकवाड इ उपस्थित होते.
फिनोलेक्स पाईप्स अँड फिटिंग्स आणि क्रिएटिव्ह फाउंडेशन सातत्याने विविध संस्थांना उपयुक्त वस्तू भेट देत असतात, विशेषतः दिव्यांग केंद्र, वृद्धाश्रम, विशेष मुलांच्या संस्था यांना दिल्या जाणाऱ्या उपयुक्त वस्तू भेटीचे सर्वच मंडळानी कौतुक केले.
आपला,
संदीप खर्डेकर.
अध्यक्ष,
क्रिएटिव्ह फाउंडेशन.
मो – 9850999995

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button