-राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शताब्दी वर्षानिमित्त ‘शाहिरी दिनदर्शिका’चे प्रकाशनशाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी यांच्या वतीने आयोजन
पुणे : शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी यांच्या वतीने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त साकारण्यात आलेल्या ‘शाहिरी दिनदर्शिका’चे प्रकाशन नागपूर येथील संघ कार्यालयात, डॉ. हेडगेवार यांच्या समाधी मंदिरासमोर करण्यात आले.
या प्रकाशन समारंभाला संस्कार भारतीचे केंद्रीय पदाधिकारी अध्यक्ष मैसूर मंजुनाथ,उपाध्यक्ष हेमलता मोहन, नीलांजना रॉय, केंद्रीय महामंत्री अश्विन दळवी, ज्येष्ठ अभिनेते प्रमोद पवार, केंद्रीय प्रतिनिधी सतीश कुलकर्णी, संघटन मंत्री अभिजीत गोखले, ज्येष्ठ गायक मुकुंद मराठे, पश्चिम प्रांत महामंत्री प्रशांत कुलकर्णी, ज्येष्ठ चित्रकार वासुदेव कामत, तसेच शाहीर हेमंतराजे मावळे उपस्थित होते.
आचार्य शाहीर हेमंतराजे मावळे षष्ठ्यब्दीपूर्ती सोहळा समिती निर्मित या विशेष दिनदर्शिकेमध्ये १२ दिवंगत ज्येष्ठ शाहीरांची माहिती समाविष्ट करण्यात आली असून, प्रत्येक महिन्यासाठी एका शाहीराचा गौरव करण्यात आला आहे. हा उपक्रम शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी या संस्थेच्या पुढाकाराने राबविण्यात आला असून, शाहिरी परंपरेतून संघाचे विचार आणि कार्य अधिक व्यापक पातळीवर पोहोचवणे हा यामागील प्रमुख हेतू आहे.
