January 19, 2026

२०२५एमआयटी डब्ल्यूपीयूतर्फे‘शाश्वततेसाठी विज्ञानाचे समन्वय’ विषयावर राष्ट्रीय परिसंवाद25 एप्रिल रोजी सकाळी 10 वा. परिसंवादाचे उद्घाटनतीन दिवसीय परिसंवाद कोथरूड येथील डब्ल्यूपीयू कॅम्पसमध्ये सुरू

0
IMG-20250424-WA0026
Spread the love

पुणे २४ एप्रिल : एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या विज्ञान आणि पर्यावरण अभ्यास शाळेतील बायोसायन्सेस आणि तंत्रज्ञान विभागातर्फे ‘शाश्वततेसाठी विज्ञानाचे समन्वयः स्वच्छ ऊर्जा, लवचिक शेती आणि वर्तुळाकार अर्थव्यवस्था’ या विषयावर तीन दिवसीय राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. तीन दिवसीय परिसंवाद २४ ते २६ एप्रिल दरम्यान कोथरूड येथील डब्ल्यूपीयूच्या कॅम्पसमधील चाणक्य बिल्डिंगमधील तोरणा हॉल मध्ये होणार आहे. अशी माहिती एमआयटी डब्ल्यूपीयूचे प्र कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे यांनी पत्रकार परिषदेते दिली.
या परिसंवादाचे उद्घाटन 25 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता राष्ट्रीय विज्ञानाचे अध्यक्ष पद्मश्री प्रा.डॉ. गणपती डी.यादव यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी एमआयटी डब्ल्यूपीयूचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड हे असतील. तसेच समारोप २६ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता होणार आहे. यावेळी आयसीएआर-डीआयएफआरचे संचालक डॉ.के.व्ही. प्रसाद आणि जेनोव्हा बायोफार्मास्युटिकल्स चे मेजर विशाल कराड उपस्थित राहणार आहेत.
हा कार्यक्रम एमआयटी डब्ल्यूपीयूचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. राहुल कराड यांच्या मार्गदर्शात संपन्न होत आहेे.
या परिसंवादात परवडणारी आणि स्वच्छ ऊर्जा, हवामान-लवचिक शेती, वर्तुळाकार अर्थव्यवस्था आणि नैसर्गिक संसाधने आणि नैसर्गिक उत्पादने आणि कार्यात्मक अन्न या चार विषयांवर चर्चा होणार आहे. ज्यामध्ये खरगपूर आयआयटीचे डॉ. आदिपुण्य मित्र, एमआयटी डब्ल्यूपीयूचे डॉ. भरत काळे, एसपीपीयूचे डॉ. विठ्ठल बरवकर, आयसीएआर-एनआरसीजीचे डॉ. सुजॉय साहा, माजी वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. मालती वेंकटेशन, आयसीजीईबीचे डॉ. शशी कुमार रोड, बीएआयएफ डेव्हलपमेंट रिसर्च फाउंडेशनचे डॉ. राजश्री जोशी, आयडब्ल्यूएमआयच्या डॉ. मानसी त्रिपाठी, सायरिओचे डॉ. समथा मॅथ्यू, डॉ. आनंद घोसाळकर, आयसीएआर एनआरसीजीचे संचालक डॉ. कौशिक बॅनर्जी, बिट्स पिलानीचे डॉ. उत्पल रॉय, लोयोला कॉलेजच्या डॉ. किरण कुमारी आणि आयसीटीच्या डॉ. रेखा सिंघल हे विचार मांडणार आहेत.
या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश्य आंतरविद्याशाखीय सहकार्यांना व नाविन्यपूर्ण विचारांना चालना देणे आणि शाश्वत भविष्यासाठी प्रभावी भागीदारी निर्माण करणे हे आहे.
येथे तळागळातील उदयोन्मुख नवोपक्रम आणि संशोधनाला प्रोत्साहन देणारे संशोधन विद्वान आणि तरूण शास्त्रज्ञांचे मौखिक आणि पोस्टर सादरीकरण देखील असेल.
या परिसंवादात शिक्षणतज्ज्ञ, संशोधक, उद्योग तज्ञ आणि तरूण वैज्ञानिक विचारांना आणि काही सर्वात महत्वाच्या शाश्वत आव्हानांना तोंड देण्यासाठी सहकार्य करण्यासाठी आणि विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी एक संगम म्हणून कार्य करणार आहे.
या कार्यक्रमाला भारत सरकारच्या अनुसंधान राष्ट्रीय संशोधन फाउंडेशनचे पाठबळ आहे. तसेच शाश्वत ग्रामीण विकास, स्वच्छ ऊर्जा आणि वर्तुळाकार जैव अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देण्यासाठी अग्रणी असलेल्या बायफ डेव्हलपमेंट रिसर्च फाउंडेशनची भागीदारी आहे. नेक्स्ट जेन सायन्सेस हे उद्योग प्रायोजक आहे.
या पत्रकार परिषदेत डब्ल्यूपीयूच्या स्कूल ऑफ सायन्स अँड एर्न्व्हामेंटल स्टडीजचे डीन इनचार्ज डॉ. अनुप काळे, डॉ. शिल्पा चापडगावकर आणि सहयोगी प्रा. डॉ. मानसी मिश्रा उपस्थित होत्या.

जनसंपर्क विभाग,
एमआयटी डब्ल्यूपीयू, पुणे

००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1200 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी

Call Now Button