- ‘फास्टेस्ट १०० मीटर ऑन स्केट्स बॅकवर्ड स्केटिंग’चा बेळगाव येथे नोंदवला विक्रम
पुणे : बेळगाव येथे झालेल्या गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये पुण्यातील अचिव्हर्स स्पीड स्केटिंग क्लबच्या ३० स्केटिंगपटूंनी ‘फास्टेस्ट १०० मीटर ऑन स्केट्स बॅकवर्ड स्केटिंग’चा विक्रम नोंदवला. या उल्लेखनीय यशाबद्दल सहा ते १३ वयोगटातील या स्केटिंगपटूंचा सत्कार करण्यात आला, तसेच गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड, लंडन येथून आलेले प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
अचिव्हर्स स्पीड स्केटिंग क्लबच्या वतीने धायरी येथील डीएसके स्कूलच्या स्केटिंग ट्रॅक स्पोर्ट्स ग्राउंडवर झालेल्या कार्यक्रमावेळी क्रीडा भारतीचे अखिल भारतीय महामंत्री केशव उर्फ राज चौधरी, पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष विजय पुरंदरे, क्रीडा भारतीचे सदस्य शरदराव गोडसे, क्रीडा भारतीचे पश्चिम महाराष्ट्र कार्यप्रमुख विजय राजपूत, आयुर्वेद व्यासपीठाचे संस्थापक सदस्य डॉ. गिरीश वेलणकर, स्केटिंग मास्टर व मुख्य प्रशिक्षक शेखर थोरात, प्रशिक्षिका प्रीती थोरात यांच्यासह पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या विक्रमामध्ये नयना कडसिध्देश्वर हिरेमठ (१३), सिया सुरेश वादी (११), निशिका पटेल (६) पार्थ भूषण ढवळीकर (८), सई अभिजित निगडे (७), शौर्यश्री सागर महामुनी (६), मंथन सोमनाथ पाटील (६), प्रचिती प्रशांत देशमाने (६), आत्रेय शेखर थोरात (७), वल्लभ शेखर थोरात (७), प्राणिल राजू रजत (९), अर्णित महेंद्र गवई (८), काश्वी गीतेश शाह (१०), गीतिका मुरली नदार (९), मैथिली मंदार बारटक्के (११), विहान प्रसाद भिडे (१२), ईवान त्रिशूल इंगळे (८), पृथा प्रवीण गवळी (९), श्रीजल विठ्ठल चामवाड (८), माही विठ्ठल चामवाड (१२), प्रिशा सतीश मोरे (८), वेदांत अमित कटके (१०), अनुज श्रीकांत बेळगांवकर (९), मायरा भारत उकरंडे (८), मयुरेश प्रशांत भोसले (९), मिहिर सारंग जोशी (७), हर्षाली सौरभ सोराटे (११), प्रथमेश प्रशांत भोसले (१०), प्रिशा विनायक रणदिवे (९), आरुष प्रणव कोल्हे (९) या स्केटिंगपटूंचा समावेश आहे.
राज चौधरी यांनी या विक्रमादित्य मुलांचे कौतुक करत ऑलिम्पिकमध्ये पुण्यातील खेळाडूंनी यश मिळवावे, असे नमूद केले. बालवयातच मुलांना खेळासाठी प्रोत्साहित केले, तर त्यांची सर्वांगीण जडणघडण होते, असेही त्यांनी सांगितले. विजय पुरंदरे यांनी विद्यार्थ्यांचे यश प्रेरणादायी असल्याचे सांगितले. मंदार बारटक्के यांनी सूत्रसंचालन व कार्यक्रमाचे संयोजन केले.
शेखर थोरात म्हणाले, “गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आमच्या ३० मुलामुलींनी यश मिळवल्याचा अभिमान आहे. स्केटिंग क्षेत्रातील खेळाडूंच्या कामगिरीला प्रोत्साहन, नवोदित खेळाडूंना प्रेरणा देण्यासह त्यांच्या यशाचा गौरव करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. खेळाडूंना दर्जेदार प्रशिक्षण देऊन आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्केटिंगपटू घडविण्यासाठी अचिव्हर्स स्पीड स्केटिंग क्लबने नेहमीच पुढाकार घेतला आहे.