महाराष्ट्रातील उच्चशिक्षित – पदवीधरांनी एकमुखाने भाजप’ला नाकारले* हा संविधानीक लोकशाही रक्षणार्थ’.. देश व्यापी संदेश…!

  • काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गोपाळदादा तिवारी


‘शिक्षक व पदवीधर’च्या निवडणुका मतपत्रिकेवरच होतात हे देखील पंतप्रधानांना समजू नये..(?) ही बौद्धिक दिवाळखोरी..!!
‘मतपत्रिकेवर मतदान’ हीच काँग्रेसची भूमिका ..!
पुणे दि ३० आक्टों –
महाराष्ट्रात झालेल्या ‘पदवीधर व शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीत, विधान परिषदेच्या ५ जागां पैकी’ ३ जागा पदवीधरा साठी” तर “२ जागा शिक्षक मतदार संघासाठी होत्या. त्यातील ३ ही पदवीधरच्या जागा’ काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस(शप) मविआ’ने जिंकल्याने, पुरोगामी महाराष्ट्रात समाजात द्वेष भावना निर्माण करणाऱ्यांच्या विरोधात मतदान करून, संविघानीक लोकशाही’च्या हीतार्थ ‘सत्तांध भाजप व महायुती विरोधात’ दिलेला कौल; हा देशव्यापी संदेश असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे वरीष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केले.
ते पुढे म्हणाले की,
आमदार श्री अभिजीत वंजारी(नागपूर पदवीधर) काँग्रेस; मा सौ हर्षदा जाधव-देशमुख* पुणे पदवीधर, राकाँ) तर मा डॅा प्रतापसिंह पाटील *संभाजीनगर-पदवीधर) राकॅा; या राज्यातील ‘पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भ या ३ स्वतंत्र उप प्रदेशातील पदवीधर मतदारांनी सद्य स्थितीत, राज्याचे व देशाचे हित लक्षात घेत अचुक मतदान करून ‘शैक्षणिक महती’ सिद्ध केली असल्याचे ही त्यांनी सांगितले.
शिव छत्रपतींचा, समाज सुधारकांचा व बंधू भावाची शिकवण देणाऱ्या संतांचा महाराष्ट्र हा पुरोगामी विचारांचाच् असून, स्वातंत्र्यपुर्व काळा पासूनच देशास दिशा देऊ पाहणाऱ्या राष्ट्रीय-सामाजिक क्रांतिकारकां ची पार्श्वभुमी असलेला हा महाराष्ट्र आहे.
त्यामुळे फॅसिस्ट शक्तींच्या व सत्तांध भाजपच्या पक्ष व सरकारे फोडाफोडीच्या असंविधानीक कृत्यांच्या, तर स्वायत्त संस्थांच्या गैरवापराच्या व मतचोरीच्या विरोधात.. राजकीय दृष्ट्या पेकाटात घातलेली ही एक प्रकारे लाथ असून, राज्यातील जनतेने ‘प्रातिनिधिक स्वरूपात’ नाकारल्याचे स्पष्ट झाल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केले.
ते पुढे म्हणाले की, उच्चशिक्षित मतदार, तात्पुरत्या धर्मांध लाटेचे बळी ठरले नाहीत कारण तणावरहित विकास आणि सामाजिक एकोप्याचे ते स्वप्न पाहतात.
शाहू-फुले-आंबेडकरांसोबतच कर्मवीर भाऊराव पाटील, बुद्धीप्रामाण्यवादी लो. टिळक आणि महान सुधारक गोपाळ गणेश आगरकर यांचाही आदर्श वसा त्यांना लाभला आहे. महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाचा वारसा प्राचीन असुन त्यास शह देण्याचे कारस्थान भाजपा आणि त्याच्या मित्रपक्षांनी रचले नि ते सुरुवातीला यशस्वी ठरल्यासारखे वाटले तरी या फासिस्ट शक्तींचा धोका मराठी माणसाला आणि सर्व देशवासियांना कळू लागला आहे.
हा संतांचा महाराष्ट्र असून येथे राक्षसी शक्ती मनमानी करत धुमाकूळ घालू शकत नाहीत. जनतेचे प्रश्न सोडून धर्माच्या नावाखाली अधर्माचे राजकारण करू शकणार नाहीत, तर येथे पुरोगामी परंपरेचे पाईकच सत्तेत हवेत असा सुशिक्षितांनी दिलेला हा इशारा आहे
ते पुढे म्हणाले की,
भाजप च्या देश व राज्य पातळीवरील शिर्ष नेतृत्वाच्या स्वतःच्या मतदारसंघात ही नागपूर, झाशी, प्रयागराज, पाटणा – नालंदा विद्यापीठ, गोरखपूर मधील उच्चशिक्षित पदवीधरांनी भाजप ला सपशेल नाकारले मात्र तरीही भाषणजीवी पंतप्रधान मोदी मात्र बॅलेट पेपरवर काँग्रेस कुठे (?) बाबत खडूसपणे प्रश्न विचारतात, मात्र पदवीधर व शिक्षक मतदारसंघात निवडणूका पसंती क्रमा नुसार “मत पत्रिकेवरच” होतात एवढेी ज्ञात नसणे ही बौद्धिक दिवाळखोरी म्हणावी काय(?) असा ही उपहासात्मक सवाल काँग्रेस वरीष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केला..!
——————-///——————
मा संपादक ——– दै वृत्त संस्था .. स न वि वि
कृपया वरील मजकुर आपल्या लोकप्रिय वृत्त दैनिकात प्रसिद्ध करणे बाबत विनंती आहे
आपला विश्वासू
भूपाल पंडीत
9730384211
प्रसिद्धी सहाय्यक
गोपाळदादा तिवारी संपर्क कार्यालय, अक्षय श्री, २१६ नारायण पेठ, केळकर रस्ता, पुणे ३०

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button