१६६८ पासून महाराष्ट्र-फ्रान्स व्यापारी वारसा ; डॉ. अमोल शिंदे यांचे IFCCI सेमिनारमध्ये प्रतिपादन

पुणे : तीन शतकांहून अधिक काळाच्या व्यापारी परंपरेचा वारसा सांगत, महाराष्ट्राने जागतिक गुंतवणुकीसाठी आपली दारे अधिक खुली केल्याचे MIDC चे सह-मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अमोल शिंदे यांनी स्पष्ट केले.

पुणे येथे झालेल्या पहिल्या इंडो-फ्रेंच मॅन्युफॅक्चरिंग सेमिनारमध्ये बोलताना डॉ. शिंदे यांनी हा एक महत्त्वाचा ऐतिहासिक संदर्भ दिला. यावेळी एमआयडीसी (MIDC)चे सह-मुख्य कार्यकारी अधिकारी (गुंतवणूक प्रोत्साहन) डॉ. अमोल शिंदे, मुंबईतील फ्रान्सचे महावाणिज्यदूत (Consul General) पॅट्रिक लेव्हेरिनो, आयएफसीसीआय (IFCCI)चे प्रादेशिक संचालिका (पश्चिम विभाग) श्वेता पाहुजा, आयएफसीसीआय (IFCCI) उद्योग समितीचे उपाध्यक्ष अरुण सधीश, महिला व बालकल्याण समिती, पुणे जिल्हा परिषदचे सभापती अंकिता पाटील, कंपनी सेक्रेटरी अभिजीत मोडक यावेळी उपस्थित होते.

पुढे बोलताना डॉ. अमोल शिंदे म्हणाले, “महाराष्ट्र आणि फ्रान्स यांच्यातील पहिला अधिकृत व्यावसायिक संबंध १६६८ मध्ये प्रस्थापित झाला, जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीला राजापूर (कोकण) येथे वखार उभारण्याची परवानगी दिली होती,”

याच ऐतिहासिक नात्याला आधुनिकतेची जोड देताना, त्यांनी महाराष्ट्र सरकारच्या गुंतवणूक सुलभतेच्या उपाययोजनांची माहिती दिली. यामध्ये IFCCI-MIDC भागीदारी, MIDC कंट्री डेस्क, MILAAP लँड पोर्टल, MAITRI 2.0 आणि इन्व्हेस्ट महाराष्ट्र या उपक्रमांचा समावेश आहे.

त्यानंतर झालेल्या CEO Roundtable मध्ये त्यांनी उद्योजकांच्या प्रश्नांना थेट उत्तरे दिली. फ्रान्सचे मुंबईतील महावाणिज्यदूत पॅट्रिक लेव्हरिनो यांच्यासह ८० हून अधिक दिग्गज उद्योजक या सेमिनारला उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button