सीजेपी, राहुल गांधी, नेहा बोरा आणि अन्य फुटीरतावादी यांनी आपल्या मर्यादेत रहावेनितीश भारद्वाज ; लोकशाही रक्षणार्थ भव्य मोर्चा : पुणेकरांची मोठी उपस्थिती


पुणे : अराजकतेला नकार, लोकशाहीला समर्थन… ‘मी भारत प्रेमी’ च्या वतीने माझा देश, माझी जबाबदारी’ या भावनेतून या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. छत्रपती संभाजी उद्यानापासून सुरु झालेल्या मोर्चाची सांगता डेक्कन जिमखाना येथे झाली. यामध्ये ५ हजार हून अधिक नागरिकांनी सहभाग घेतला.

प्रसिद्ध कलाकार नितीश भारद्वाज यांनी लोकशाही आणि संविधानाला आव्हान देणाऱ्या फुटीरतावादी शक्तींना रोखण्याचे आवाहन केले. तसेच सीजेपी, विरोधी पक्षनेते राहुल गांधी, नेहा बोरा यासारख्या लोकांनी विनाकारण अराजकता माजून सामान्य नागरिकांना त्रास देऊ नये, अन्यथा ही सज्जनशक्ती तुम्हाला त्यापेक्षा जास्त अधिक ताकदीने प्रत्युत्तर देईल. भारद्वाज यांनी लोकशाहीची मूल्य जपण्यासाठी आपण सर्वांनी कटिबद्ध राहिले पाहिजे, असे सांगितले.

देशाची एकता, अखंडता आणि लोकशाही मूल्यांचे रक्षण करण्यासाठी तसेच समाजात अराजकता निर्माण करण्याच्या प्रवृत्तींच्या विरोधात जनजागृती करण्याच्या उद्देशाने मोर्चा काढण्यात आला. अराजकतेविरोधात आणि लोकशाहीच्या रक्षणार्थ आयोजित मोर्चात महिलांचा देखील मोठा सहभाग होता.

लोकशाही व्यवस्थेमध्ये प्रत्येक नागरिकाला आपले प्रश्न, समस्या आणि मत शांततापूर्ण व संविधानिक मार्गाने मांडण्याचा अधिकार आहे. मात्र, लोकशाही मार्गाने प्रश्न मांडण्याऐवजी अराजकतेला प्रोत्साहन देणे, सार्वजनिक संस्थांवर बिनबुडाचे आरोप करून समाजात अविश्वासाचे वातावरण निर्माण करणे आणि सामाजिक सलोखा बिघडविण्याचे प्रयत्न करणे, या प्रवृत्तींविरोधात नागरिकांनी एकत्र येणे आवश्यक आहे. त्यामुळे हा मोर्चा देशाची एकता, अखंडता, लोकशाही व्यवस्था आणि संविधानिक मूल्यांच्या समर्थनार्थ नागरिकांचा आवाज बुलंद करण्याचा प्रयत्न आहे.

मतभेद असणे हा लोकशाहीचा अविभाज्य भाग आहे; परंतु मतभेद व्यक्त करताना शांतता, कायद्याचा आदर आणि सामाजिक जबाबदारी जपणे तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे या मोर्चाच्या माध्यमातून नागरिकांनी लोकशाही व्यवस्थेवरील विश्वास दृढ करावा, राष्ट्रहिताला प्राधान्य द्यावे आणि समाजात शांतता व एकात्मतेचे वातावरण टिकवण्यासाठी सक्रिय भूमिका बजावावी, हा यामागील उद्देश होता.

  • फोटो ओळ : ‘मी भारत प्रेमी’ च्या वतीने माझा देश, माझी जबाबदारी’ या भावनेतून लोकशाहीच्या रक्षणार्थ मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. छत्रपती संभाजी उद्यानापासून सुरु झालेल्या मोर्चाची सांगता डेक्कन जिमखाना येथे झाली. यामध्ये ५ हजार हून अधिक नागरिकांनी सहभाग घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button