श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचेतिसरे मोफत आरोग्य सेवा केंद्र कात्रजमध्ये

सोमवार दिनांक 2 नोव्हेंबर 2026 पासून कामकाजास प्रारंभ

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या जयगणेश रुग्णसेवा अभियानांतर्गत तिसरे मोफत आरोग्य सेवा केंद्र कात्रज भागात उद्या (सोमवार) पासून सुरू होत असल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष महेश सूर्यवंशी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

हे मोफत आरोग्य सेवा केंद्र सर्व्हे क्र.४४/५, अचल फार्म, सच्चियाई माता मंदिर, पाण्याच्या टाकीजवळ, आंबेगाव खुर्द, कात्रज येथे सुरू होत आहे. केंद्राची वेळ सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत राहील. या केंद्रात मोफत नेत्र तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, विविध प्रकारच्या रक्त तपासण्या, बाह्य रुग्ण विभाग, जनरल औषधोपचार, श्रवण क्षमता तपासणी, श्रवण यंत्र वाटप, कृत्रिम अवयव उपकरणे वाटप, ईसीजी तपासणी, ॲक्यूप्रेशर व ॲक्यूपंक्चर उपचार, फिजिओथेरपी उपचार, लसीकरण आदी सुविधा उपलब्ध रहातील, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष महेश सूर्यवंशी यांनी दिली आहे.

ट्रस्टच्यावतीने सारसबागेजवळील हिराबाग कोठी आणि धनकवडी येथील काशिनाथ पाटील नगर येथे आरोग्य सेवा केंद्र आहेत. कात्रज मधील सेवा केंद्र हे तिसरे केंद्र आहे. ट्रस्टचे विश्वस्त, पदाधिकारी आणि सुवर्णयुग तरूण मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या सहकार्यातून ही केंद्र यशस्वीपणे चालविली जात आहेत. या केंद्रांमुळे हजारो नागरिकांना वैद्यकीय दृष्ट्या दिलासा मिळाला आहे. सेवाभावी वृत्तीतून हा उपक्रम चालविला जात असून, कात्रज आणि आसपासच्या परिसरातील रहिवाशांनी या सेवा केंद्राचा लाभ घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन अध्यक्ष महेश सूर्यवंशी यांनी केले आहे.

कळावे.

आपला,
महेश सूर्यवंशी,
अध्यक्ष.

अधिक माहितीसाठी :

राजेंद्र परदेशी,
वैद्यकीय सेवा व्यवस्थापक,
मो. ९९२२२ ६२१७४.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button