January 19, 2026

महाविद्यालयीन जीवनात खूप काही शिकण्यासारखे, ते शिकासिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील ; स.प.महाविद्यालय, मुख्य इमारत शताब्दी निमित्ताने, माजी विद्यार्थी सनदी अधिकारी मेळावा

0
IMG-20251129-WA0061
Spread the love

पुणे : सन १९५७ ते १९६१ या कालावधीत मी स.प. महाविद्यालयाचा विद्यार्थी होतो. त्या काळात चांगले गुरु लाभल्यामुळे योग्य मार्गदर्शन मिळाले. जीवनात काय करायचे ते योग्य वेळी ठरले पाहिजे. महाविद्यालयीन जीवनात खूप काही शिकण्यासारखे आहे ते शिका, असा संदेश सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी दिला.

स.प.महाविद्यालय, मुख्य इमारत शताब्दी निमित्ताने, माजी विद्यार्थी सनदी अधिकारी मेळावा शिक्षण प्रसारक मंडळी च्या पुढाकाराने देवी रमाबाई सभागृहामध्ये आयोजित करण्यात आला होता. श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन झाले. यावेळी शिक्षण प्रसारक मंडळीचे अध्यक्ष ॲड.सदानंद फडके, शिक्षण प्रसारक मंडळीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष ॲड.एस.के.जैन, नियामक मंडळाचे उपाध्यक्ष श्रीकृष्ण चितळे, गजेंद्र पवार, महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष केशव वझे, सचिव डॉ. राधिका इनामदार, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अविनाश मोहरील, माजी प्राचार्य, उपप्राचार्य, डॉ. संज्योत आपटे व शिक्षण प्रसारक मंडळीच्या नियामक मंडळाचे सदस्य सतिश पवार, किरण शाळीग्राम, पराग ठाकूर, ॲड.मिहीर प्रभुदेसाई, सुधीर काळकर उपस्थित होते.

मा प्राचार्य डॉ.अविनाश मोहरील यांनी सर्वांचे स्वागत केले आणि पुढच्या पिढीच्या विद्यार्थ्यांना योग्य मार्ग दाखवणारा हा मेळावा आहे, असे सांगितले. केशव वझे यांनी सध्याच्या काळात महाविद्यालयीन जीवनात चांगली संगत त्यांच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावते. हे समजावून देण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांनी कोणती परंपरा, व्यवस्था आणि संस्कृती पाळावी, याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे असे सांगितले.

ॲड.एस. के. जैन म्हणाले, नोकरीसाठी विद्यार्थ्यांनी अमेरिकेसारख्या देशांवर अवलंबून राहण्याची आवश्यकता नाही; नोकरीच्या संधी भारतातच निर्माण करायला हव्यात. जीवनात कोणत्याही क्षेत्रात उंची गाठण्यासाठी चांगल्या सवयी आणि योग्य मार्गदर्शन गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.

शिक्षण प्रसारक मंडळीने मागील वर्षापासून बी.ए, सिव्हिल सर्व्हीसेस हा नवीन अभ्यासक्रम सुरू केला आहे. महाविद्यालयाच्या ऐतिहासिक वारसा सांगणाऱ्या इमारतीचे हे शताब्दी वर्ष आहे. त्याचप्रमाणे केंद्रीय लोकसेवा आयोगाचे ही हे शताब्दी वर्ष आहे. या सर्व गोष्टींचा संगम साधून महाविद्यालयाने हा मेळावा आयोजित केला होता. उद्घाटन समारंभात महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी प्रशासकीय सेवेतील पन्नासहून अधिक अधिकारी सहभागी झाले होते. या सर्वांचे स्वागत व सत्कार या समारंभात करण्यात आले.

ॲड. सदानंद फडके म्हणाले, सर्व आजी-माजी विद्यार्थी हे स.प. महाविद्यालयाची खरी ताकद आहेत. आगामी काळातील आव्हाने नवीन विद्यार्थ्यांना समजावून सांगणारे तत्ववादी अधिकारी महाविद्यालयाला हवे आहेत, असेही त्यांनी सांगितले

कार्यक्रमात आयकर विभाग, पुणे मुख्य आयुक्त विवेक वाडेकर, शालेय शिक्षण विभाग शिक्षण मंत्रालय भारत अतिरिक्त सचिव आनंद पाटील, ग्रामीण विकास आणि पंचायत पंजाब प्रशासकीय सचिव अजित जोशी, भू संसाधन विभाग भारत सहसचिव नितीन खाडे, महाराष्ट्र सहकारी विकास महामंडळ अध्यक्ष मंगेश तिटकरे, खेळ व युवा सेवा आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे शीतल उगले, यांनी मनोगत व्यक्त केले. बी.ए.सिव्हील सर्व्हिसेस संचालक प्रा.डॉ.संज्योत आपटे यांनी सूत्रसंचालन केले. कला शाखा उपप्राचार्य प्रा. डॉ. विद्या अवचट यांनी आभार मानले.

उद्घाटन समारंभानंतर नागरी सेवेत काम करण्यास इच्छुक असणाऱ्या व त्यासाठी स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या विविध गट चर्चांमध्ये प्रशासकीय अधिकारी सहभागी झाले. त्यांच्या व्याख्यानांमधून विद्यार्थ्यांना प्रशासकीय सेवेबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर प्रशाकीय अधिकाऱ्यांनी विविध शैक्षणिक विभागांना भेटी देऊन तेथे उपस्थित असलेल्या माजी – आजी प्राध्यापक व विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधला. यानंतर “ वास्तू ऋण” या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित कलामंडळाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाने सांगता झाली.

  • फोटो ओळ : स.प.महाविद्यालय, मुख्य इमारत शताब्दी निमित्ताने, माजी विद्यार्थी सनदी अधिकारी मेळावा शिक्षण प्रसारक मंडळी च्या पुढाकाराने देवी रमाबाई सभागृहामध्ये आयोजित करण्यात आला होता. श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन झाले. यावेळी त्यांचा व महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी जे सनदी अधिकारी झाले त्यांचा सन्मान करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1200 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी

Call Now Button