January 19, 2026

पुणे महानगरपालिकेने ज्येष्ठ नागरिक संघांसाठी अर्थसंकल्पात तरतूद करावी – संदीप खर्डेकर.

0
IMG-20251129-WA0028
Spread the love

क्रिएटिव्ह फाउंडेशन तर्फे विविध ज्येष्ठ नागरिक संघ , हास्यक्लब व इतरांसाठी खुर्च्या भेट – सौ.मंजुश्री खर्डेकर.

पुणे महानगरपालिकेने ज्येष्ठ नागरिक संघ, हास्यक्लब, योग केंद्रासाठी येत्या अर्थसंकल्पात तरतूद करावी अशी मागणी क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी मनपा आयुक्त नवलकिशोर राम यांच्या कडे केली आहे. ज्येष्ठ नागरिक हे शहराचे भूषण असून त्यांचा आयुष्याचा उत्तरार्ध आनंदात जावा हे पाहणे शहरवासियांचे कर्तव्य असून त्यासाठी मनपा प्रशासनाने येत्या अर्थसंकल्पात तरतूद करावी असेही ते म्हणाले.
क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या वतीने विविध संघांना खुर्च्या, स्पीकर सेट, खेळाचे साहित्य इ भेट देण्याच्या विविध ठिकाणी झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या विश्वस्त माजी नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, विश्वस्त सतीश कोंडाळकर, राजेंद्र गादिया व इतर मान्यवर उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड मनपा ने ज्येष्ठ नागरिकांना टी. व्ही, कपाट, खुर्च्या इ साहित्य भेट देण्यासाठी तरतूद केली होती त्याची आठवण ही संदीप खर्डेकर यांनी करून दिली. मनपा च्या अनेक तरतुदी अनावश्यक असून करदात्या नागरिकांना त्याचा कोणताही लाभ होत नाही. त्यामुळे आयुक्तांनी गांभीर्याने ह्या मागणीचा विचार करावा असेही खर्डेकर म्हणाले.
ज्येष्ठ नागरिकांसोबत आता काही प्रमाणात युवा वर्ग देखील अश्या संघांच्या दैनंदिन उपक्रमात सहभागी होत आहे, अश्या परिस्थितीत खुर्च्या, सतरंजी, खेळाचे साहित्य ( कॅरम बोर्ड व इतर ) कपाट, टीव्ही सेट अश्या वस्तू उपलब्ध कराव्यात असेही खर्डेकर म्हणाले.
क्रिएटिव्ह फौंडेशन सामाजिक बांधिलकीची जाण ठेऊन आपल्या परीने साहित्य भेट देत असतं मात्र शहराची व्याप्ती बघता मोफत उपक्रम राबविणाऱ्या ज्येष्ठ नागरिक संघ, दैनंदिन योगाभ्यास करणारे केंद्र, हास्य संघ अश्यांना सहाय्य केले जावे अशी अपेक्षा माजी नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी व्यक्त केली.डहाणूकर कॉलनीतील कै. बाळासाहेब ठाकरे उद्यानात नवचैतन्य हास्ययोग परिवारास खुर्च्या भेट देण्यात आल्या त्यावेळी त्या बोलत होत्या.यावेळी सुधीर देशपांडे,सौ. शैलजा देशपांडे, अशोक पुजारी, सौ. सरोजिनी कांबळे, श्रीमती सरिता कर्वे, सौ. शुभदा कुलकर्णी, संजय फडके इ मान्यवर उपस्थित होते.
नागरिकांचे भरभरून प्रेम, दैनंदिन जनसंपर्क आणि कामकाज ग्रुप्स च्या माध्यमातून 48 तासात नागरी समस्या सोडविण्याची हातोटी हीच आमच्या साठी जमेची बाजू असून राजकारणापेक्षा समाजकारण जास्त समाधान देते असेही मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या.
लॉ कॉलेज रस्त्यावरील शांतिशीला सोसायटी येथे श्री.हेमंत येरवडेकर, अध्यक्ष,
श्री शेखर जोशी सेक्रेटरी,
श्रीमती मंजुषा कुलकर्णी,
कार्यकारिणी सदस्य,
श्री अनिल देशपांडे,रोहित जोशी
ओमकार अग्निहोत्री,
आरोही करमरकर, अश्विनी सप्रे,जुई खांबेटे,पर्णाली जगताप,सोनल आराध्ये,वासंती पुरोहित,सौ सुप्रिया जोशी,क्षमा देशपांडे,रत्नप्रभा वैद्य,डॉ.इरा जमेनीस,
लता प्रभावळकर,
भावना मोटे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.
तर देवेंद्र सोसायटी परिसरातील दत्त मंदिर येथे श्री. प्रमोद रायकर, रामचंद्र टांकसाळे,सौ. शिल्पा वैद्य, सौ. दीपा सभापती, अप्पा कुरे, सौ. सुधा कुरे,यांच्यासह अनेक नागरिकांची उपस्थिती होती.
एरंडवणे ज्येष्ठ नागरिक संघास स्पीकर सेट भेट देण्यात आला. यावेळी मंजुश्री खर्डेकर यांच्या हस्ते डॉ. अलकनंदा भानू, श्री. प्रमोद शेजवलकर व इतर मान्यवर उपस्थित होते. संजय गांधी वसाहतीतील वीर चि. संजय गांधी तरुण मंडळ श्री गणेश मंडळास क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या वतीने विश्वस्त सौ. मंजुश्री खर्डेकर यांच्या तर्फे स्पीकर सेट भेट देण्यात आला.यावेळी जयंतराव भावे, मंदारजी बलकवडे,संतोषजी लांडे, केतकीताई कुलकर्णी, राजेंद्र येडे, शंतनू खिलारे,संगीताताई शेवडे,मनोज बलकवडे, वसाहतीतील नागरिक व इतर प्रमुख उपस्थित होते.
क्रिएटिव्ह फाउंडेशन ने पुढील 5 वर्षांचे नियोजन केले असून विविध संस्थांना उपयुक्त वस्तू भेट देण्याचा उपक्रम निरंतर सुरु राहणार असल्याचे ही मंजुश्री खर्डेकर यांनी जाहीर केले.

आपला,
संदीप खर्डेकर,
अध्यक्ष,
क्रिएटिव्ह फाउंडेशन.
मो – 9850999995

ता. क….कृपया आपले मेल id WhatsApp किंवा मेसेज द्वारे कळवावे ही विनंती 🙏

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1200 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी

Call Now Button