जनसंपर्क’ लोकांशी जोडणारा एक विश्वासाचा दुवाआमदार सिद्धार्थ शिरोळे यांचे मत : डॉ. अजय दुधाणे यांच्या जनसंपर्क कार्यालय शुभारंभ सोहळा ; नागरिकांसाठी मतदार कार्ड व आधार कार्ड दुरुस्ती योजनेचा शुभारंभ
पुणे : जनसंपर्क कार्यालयाची स्थापना ही फक्त एक प्रशासकीय गरज नसून लोकांशी जोडणारा एक विश्वासाचा दुवा आहे. कोणताही विषय हाती घेतल्यानंतर त्याचा पूर्ण अभ्यास करून त्या समस्याचे निवारण करणारे व्यक्ती म्हणजे डाॅ. अजय दुधाणे आहेत. या कार्यालयाच्या माध्यमातून ते नक्कीच नागरिकांच्या समस्या सोडवत प्रशासन आणि जनता यांच्यातील नाते मजबूत करतील असे मत आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी व्यक्त केले.
छत्रपती शिवाजीनगर मॉडेल कॉलनी येथे पुणे शहर एनजीओ आघाडी अध्यक्ष, तसेच छत्रपती शिवाजीनगर मतदार संघाचे सरचिटणीस डॉ. अजय दुधाणे यांच्या प्रभाग क्र १२ छत्रपती शिवाजीनगर- मॉडल कॉलनी जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे, नगरसेविका स्वाती लोखंडे, आदित्य माळवे, रविंद्र साळेगावकर, शैलेश बड़दे, आनंद छाजेड, सचिन वाडेकर, शाम सातपुते, समाधान शिंदे, संदीप काळे, सचिन मानवतकर, हेमंत डाबी, किरण ओरसे, दत्ता सोनार, दीपराज चव्हाण, सूरज नाइक, अमित शिंदे यांसह इतर पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते. यावेळी नागरिकांसाठी मतदार कार्ड व आधार कार्ड दुरुस्ती योजनेचा देखील शुभारंभ करण्यात आला.
डॉ. अजय दुधाणे म्हणाले, पुणे शहर एनजीओ आघाडी अध्यक्ष, तसेच छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघाचा सरचिटणीस म्हणून काम केल्यानंतर, जनसेवेचे हे व्रत पुढे घेऊन जाण्यासाठी मॉडेल कॉलनी यथे जनसंपर्क कार्यालय सुरू केले आहे. कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांच्या अपेक्षा, प्रश्न आणि सूचना यांना प्रतिसाद देत पारदर्शकता, संवाद आणि सहकार्य यांना नवीन आयाम देऊ, असेही त्यांनी सांगितले.
फोटो ओळ – छत्रपती शिवाजीनगर मॉडेल कॉलनी येथे पुणे शहर एनजीओ आघाडी अध्यक्ष, तसेच छत्रपती शिवाजीनगर मतदार संघाचे सरचिटणीस डॉ. अजय दुधाणे यांच्या प्रभाग क्र १२ छत्रपती शिवाजीनगर- मॉडल कॉलनी जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी नागरिकांसाठी मतदार कार्ड व आधार कार्ड दुरुस्ती योजनेचा देखील शुभारंभ करण्यात आला.
