टाटा नेक्सॉन सप्टेंबर २०२५ मध्ये भारतातील पहिल्या क्रमांकाची विक्री होणारी कार
ठरली
एडीएएस सेफ्टी टेकच्या सादरीकरणासह नेतृत्व दृढ केले
नेक्सॉन रेड #डार्क एडिशन लाँच
; किंमत १२.४४ लाख रूपयांपासून; पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीमध्ये उपलब्ध
मुंबई, १६ ऑक्टोबर २०२५ – टाटा मोटर्स पॅसेंजर वेईकल्स (टीएमपीव्ही) या भारतातील आघाडीच्या
ऑटोमोटिव्ह उत्पादक कंपनीने आज त्यांच्या नेक्सॉन लाइनअपमध्ये अॅडवान्स्ड ड्रायव्हर असिस्टण्स
सिस्टम्स (एडीएएस)च्या समावेशाची घोषणा केली. भारतात सुरक्षितता क्रांतीमध्ये अग्रस्थानी असलेली
नेक्सॉन ५-स्टार सेफ्टी रेटिंग मिळवणारी देशातील पहिली कार होती आणि जीएनसीएपी व
बीएनसीएपीकडून दोन ५-स्टार रेटिंग्ज असलेली एकमेव एसयूव्ही म्हणून आपला वारसा कायम ठेवला
आहे. ऑटोनॉमस इमर्जन्सी ब्रेकिंग, फॉरवर्ड कोलिजन वॉर्निंग, लेन किप असिस्ट, ट्रॅफिक साइन रेकग्निशन
अशा भर करण्यात आलेल्या एडीएएस वैशिष्ट्यांसह नेक्सॉन आता उच्च स्तरीय सुरक्षितता देते. तसेच,
नेक्सॉन सप्टेंबरमध्ये भारतातील पहिल्या क्रमांकाची विक्री होणारी कार ठरली, जो ब्रँडसाठी आणखी एक
अभिमानास्पद क्षण आहे. या यशाला साजरे करण्यासाठी टाटा मोटर्सने विशेष रेड #डार्क एडिशन देखील लाँच
केली आहे, जी पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी पॉवरट्रेन्समध्ये उपलब्ध असून किंमत १२.४४ लाख
रूपयांपासून आहे.
नेक्सॉन लाइनअपमधील नवीन भर:
परसोना किंमत रूपयांमध्ये (लाख)
फिअरलेस +पीएस डीसीए एडीएएस १३.५३ लाख
परसोना – रेड #डार्क किंमत रूपयांमध्ये (लाख)
पेट्रोल एमटी १२.४४ लाख
पेट्रोल डीसीएसह एडीएएस १३.८१ लाख
सीएनजी एमटी १३.३६ लाख
डिझेल एमटी १३.५२ लाख
डिझेल एएमटी १४.१५ लाख
नेक्सॉनची कामगिरी आणि एडीएएस व रेड #डार्कच्या लाँचला साजरे करत टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक
मोबिलिटी लि.चे चीफ कमर्शियल ऑफिसर श्री. विवेक श्रीवत्स म्हणाले, ”२०१७ मध्ये पदार्पण केल्यापासून
नेक्सॉनने आकर्षक डिझाइन, थरारक कामगिरी आणि अद्वितीय सुरक्षिततेसह एसयूव्ही श्रेणीला नव्या
उंचीवर नेले आहे. सुरक्षितता क्रांतीमध्ये अग्रणी असलेली भारतातील पहिली कार नेक्सॉनने वेईकल
सुरक्षिततेमध्ये नवीन मापदंड स्थापित केले आहेत. या प्रबळ पायाला अधिक दृढ करत नेक्सॉन सप्टेंबर
२०२५ मध्ये भारतातील पहिल्या क्रमांकाची विक्री होणारी कार ठरली आहे. या प्रमुख संपादनामधून
देशभरातील ग्राहकांचा विश्वास व पसंती दिसून येते. या साजरीकरणाचा भाग म्हणून आम्ही रेड #डार्क
एडिशन लाँच करत आहोत आणि प्रगत सुरक्षितता तंत्रज्ञानांसह नेक्सॉन पोर्टफोलिओ वाढवत आहोत.
पॉवरट्रेन्सची व्यापक श्रेणी, विभागातील अग्रणी वैशिष्ट्ये आणि आकर्षक स्टायलिंगसह नेक्सॉन प्रत्येक
जीवनशैलीच्या गरजांची पूर्तता करत आहे. नुकतेच जीएसटीमध्ये करण्यात आलेल्या सुधारणांनी या
वेईकलचे मूल्य तत्त्व अधिक दृढ केले आहे, ज्यामुळे भारतातील ग्राहकांसाठी स्वाभाविक निवड बनली आहे.
या टप्प्यामधून प्रगती, कार्यक्षमता व उद्देश असलेली उत्पादने वितरित करण्याप्रती, तसेच भारतातील
आधुनिक ग्राहकांच्या महत्त्वाकांक्षांची पूर्तता करण्यासाठी विकसित होण्याप्रती आमची कटिबद्धता अधिक दृढ
होते.”
नेक्सॉन पोर्टफोलिओमधील नवीन सादरीकरणांबाबत अधिक माहिती:
एडीएएस सेफ्टी टेक बाबत
नेक्सॉन सक्रिय सुरक्षितता तंत्रज्ञानांची प्रगत श्रेणी देते, जे ड्रायव्हरला माहिती देतात, प्रतिक्रिया वेळ
सुधारतात आणि संभाव्य अपघात टाळण्यास मदत करतात, ज्यामुळे रस्त्यावर प्रत्येकासाठी सुरक्षित
प्रवासाची खात्री मिळते.
प्रमुख एडीएएस वैशिष्ट्ये:
- फॉरवर्ड कोलिजन वॉर्निंग (एफसीडब्ल्यू): पुडील बाजूस संभाव्य प्रभावांबाबत ऑडिओ-व्हिज्युअल
अलर्ट देते. - ऑटोनॉमस इमर्जन्सी ब्रेकिंग (एईबी): ड्रायव्हरने वेळेत प्रतिक्रिया दिली नाही तर आपोआपपणे ब्रेक
लावते. - लेन डिपार्चर वॉर्निंग (एलडीडब्ल्यू): नकळतपणे लेन (मार्ग) बदल्यास ड्रायव्हरला अलर्ट करते.
- लेन सेंटरिंग सिस्टम (एलसीएस): वेईकलला योग्यरिल्या लेनमध्ये ठेवते.
- लेन किप असिस्ट (एलकेए): लेनवरील शिस्त कायम ठेवण्यासाठी योग्य स्टिअरिंग देते.
- हाय बीम असिस्ट (एचबीए): रात्रीच्या वेळी सुस्पष्टपणे दिसण्यासाठी आपोआपपणे हेडलाइट्स
समायोजित करते. - ट्रॅफिक साइन रेकग्निशन (टीएसआर): ड्रायव्हरला माहिती देण्यासाठी रस्त्यावरील महत्त्वपूर्ण चिन्हे
ओळखते आणि दाखवते.
नेक्सॉन रेड #डार्क
रेड #डार्क एडिशन लाल रंगाच्या अॅसेंट्स, तसेच विशेष युजर इंटरफेस आणि इन्फोटेन्मेंट सिस्टम व
इन्स्ट्रूमेंट क्लस्टरसाठी अनुभवासह नेक्सॉनची प्रीमियम अपील व आकर्षकता वाढवते. टाटा मोटर्सच्या
मल्टी-पॉवरट्रेन धोरणाशी संलग्न राहत नेक्सॉन रेड #डार्क पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी पर्यायांमध्ये
उपलब्ध आहे. विशेष अॅटलास ब्लॅकमध्ये फिनिशिंग करण्यात आलेल्या नेक्सॉन रेड #डार्कमध्ये #डार्क
मॅस्कॅटसह रेड लेटरिंग, तसेच पियानो ब्लॅक ग्रिल सराऊंड, रूफ रेल्स आणि स्किड प्लेट्स आहेत, जे
वेईकलला परिपूर्ण आकर्षक लुक देतात.
आतील बाजूस ग्रॅनाइट ब्लॅक केबिनसह रेड हायलाइट्समध्ये रेड लेदरेट हवेशीर फ्रण्ट सीट्ससोबत डायमंड
क्विल्टिंग व कॉन्ट्रास्ट रेड स्टिचिंग, डॅशबोर्ड व सेंटर कन्सोलवर रेड अॅसेंट्स आणि #डार्क चिन्ह असलेले
हेडरेस्ट्स आहेत. प्रीमियम मटेरिअल फिनिशेस् व रिअर सनशेड कम्फर्टमध्ये अधिक वाढ करतात.
