टोयोटा किर्लोस्कर मोटरकडून एक्सक्लुसिव्ह स्टायलिंग पॅकेजसह अर्बन क्रूझर हायराइडर ऐरो एडिशन लाँच
• हायराइडरच्या प्रीमियम एसयूव्ही परसोनाला अधिक वाढवत नवीन एडिशन विशेष स्टायलिंग किटसह येते, ज्यामध्ये फ्रण्ट स्पॉयलर, रिअर स्पॉयलर आणि साइड स्कर्ट्स आहेत.
• सर्व हायराइडर ग्रेड्समध्ये उपलब्ध, ज्यामुळे ग्राहकांना त्यांची पसंतीची व्हेरिएण्ट निवडण्याचा पर्याय आहे.
• एक्सक्लुसिव्ह स्टायलिंग पॅकेज अॅक्सेसरीज ३१,९९९ रूपयांच्या अतिरिक्त खर्चासह उपलब्ध आहेत.
• ऐरो एडिशन चार रंगांमध्ये उपलब्ध आहे – व्हाइट, सिल्व्हर, ब्लॅक आणि रेड.
बेंगळुरू, १६ ऑक्टोबर २०२५: टोयोटा किर्लोस्कर मोटर (टीकेएम)ने आज अर्बन क्रूझर हायराइडर ऐरो एडिशन लाँच केली. ही लिमिटेड-एडिशन स्टायलिंग पॅकेज टोयोटाच्या लोकप्रिय एसयूव्हीमध्ये प्रतिष्ठा व प्रीमियम अपीलच्या अतिरिक्त आकारमानाची भर करते. रस्त्यावर हायराइडरची उपस्थिती वाढवण्यासाठी डिझाइन करण्यात आलेल्या ऐरो एडिशनमध्ये लक्षवेधक आकर्षकतेसह सुधारित वैशिष्ट्ये आहेत, जी अत्याधुनिकता, वैयक्तिक सुविधा व आधुनिक आरामदायीपणाचा शोध घेत असलेल्या ग्राहकांच्या महत्त्वाकांक्षांची पूर्तता करते.
विशेष स्टायलिंग वैशिष्ट्ये, जी सर्व हायराइडर ग्रेड्समध्ये उपलब्ध आहेत:
• फ्रण्ट स्पॉयलर – भर करण्यात आलेले नवीन फ्रण्ट स्पॉयलर एसयूव्हीच्या आकर्षकतेला वाढवते, वेईकलला लक्षवेधक आणि अधिक कणखर पवित्रा देते.
• रिअर स्पॉयलर – स्टाइल व कार्यक्षमतेसाठी डिझाइन करण्यात आलेले नवीन रिअर स्पॉयलर स्पार्टी आकर्षकता वाढवते, तसेच ऐरोडायनॅमिक कार्यक्षमतेमध्ये योगदान देते.
• साइड स्कर्ट्स – नवीन डिझाइन करण्यात आलेले साइड स्कर्ट्स आकर्षक लाइन्सची भर करतात, जे गतीशील, लो-स्लंग प्रोफाइल तयार करतात, तसेच एसयूव्हीचा प्रीमियम व कार्यक्षमता-प्रेरित लुक अधिक वाढवतात.
एक्सक्लुसिव्ह स्टायलिंग पॅकेज अॅक्सेसरीज ३१,९९९ रूपयांच्या अतिरिक्त खर्चासह उपलब्ध आहेत आणि देशभरातील सर्व टोयोटा डिलरशिप्समध्ये देण्यात येतील.
२०२२ मध्ये लाँच झाल्यापासून अर्बन क्रूझर हायराइडरला भारतातील एसयूव्ही ग्राहकांमध्ये त्वरित लोकप्रियता मिळाली आहे, नुकतेच १६८,००० युनिट्स विक्रीचा टप्पा पार केला आहे. टोयोटाच्या प्रख्यात जागतिक एसयूव्ही वारशाला अधिक दृढ करत हायराइडरमध्ये आकर्षक व अत्याधुनिक स्टायलिंगसह प्रगत तंत्रज्ञान आहे, ज्यामुळे सूक्ष्मदर्शी ग्राहकांसाठी ही पसंतीची निवड आहे. नवीन विचारपूर्वक डिझाइन करण्यात आलेल्या अॅक्सेसरीजचा समावेश करण्यासह विशेष एडिशन एसयूव्हीच्या सिग्नेचर आकर्षकतेला अधिक वाढवते, जी रस्त्यावर खास उपस्थिती दर्शवते. ऐरो एडिशन चार रंगांमध्ये येते – व्हाइट, सिल्व्हर, ब्लॅक आणि रेड.
अर्बन क्रूझर हायराइडर १०.९४ लाख रूपयांपासून (एक्स-शोरूम) आकर्षक किमतीमध्ये येते.
बी-एसयूव्ही श्रेणीमध्ये उत्कृष्टतेला नव्या उंचीवर नेले
टोयोटाच्या शाश्वत गतीशीलता ऑफरिंग्जपैकी एक अर्बन क्रूझर हायराइडरने आपल्या अग्रणी सेल्फ-चार्जिंग स्ट्रॉंग हायब्रिड इलेक्ट्रिक पॉवरट्रेनसह बी-एसयूव्ही श्रेणीमध्ये नवीन मानक स्थापित केले आहे. या सर्वोत्तम सिस्टममध्ये विनासायासपणे पेट्रोल व इलेक्ट्रिक शक्तीचा समावेश आहे, ज्यामधून उल्लेखनीय इंधन कार्यक्षमतेसह सुलभ व शांतमय कामगिरीची खात्री मिळते.
सेल्फ-चार्जिंग स्ट्रॉंग हायब्रिड इलेक्ट्रिक पॉवरट्रेन आणि निओ ड्राइव्ह या दोन पॉवरट्रेन्समध्ये उपलब्ध आहे. सेल्फ-चार्जिंग स्ट्रॉंग हायब्रिड इलेक्ट्रिक वेईकलमध्ये ई-ड्राइव्ह ट्रान्समिशन आहे आणि इंजिन शट-ऑफसह इलेक्ट्रिक शक्तीवर ४० टक्के अंतर आणि ६० टक्के वेळेपर्यंत ड्राइव्ह करता येते, तसेच २७.९७ किमी/लीटर इंधन कार्यक्षमता देते. याव्यतिरिक्त, निओ ड्राइव्हमध्ये १.५-लीटर के-सिरीज इंजिन, फाइव्ह-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आणि सिक्स-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह २डब्ल्यूडी व ४डब्ल्यूडी पर्याय आहेत.
हायराइडरच्या एक्स्टीरिअरमध्ये आकर्षक क्रिस्टल अॅक्रिलिक ग्रिल, सिग्नेचर ट्विन एलईडी डीआरएल, शिल्पाकृती लाइन्स आणि स्टायलिश १७-इंच अलॉइ व्हील्स आहेत. केबिनमध्ये आरामदायीपणा व सोयीसुविधा वाढवण्यात आल्या आहेत, जेथे हवेशीर लेदर सीट्स, पॅनोरॅमिक सनरूफ, वायरलेस अॅप्पल कारप्ले व अँड्रॉइड ऑटो असलेले ९-इंच टचस्क्रिन, वायरलेस चार्जिंग, अॅम्बियण्ट लायटिंग आणि ३६०-डिग्री कॅमेरा आहे. व्यावहारिक सुविधा जसे रिअर रिक्लाइन सीट्स, रिअर एसी व्हेण्ट्स, यूएसबी चार्जिंग आणि स्थिर ६०:४० स्प्लिट रिअर सीट खात्री देतात की, हायराइडर भारतातील आधुनिक कुटुंबांच्या गरजांसाठी परिपूर्णपणे अनुकूल आहे.
टोयोटाने मालकीहक्क अनुभवाला अधिक उत्साहित केले आहे, जेथे ६६ विशेष अॅक्सेसरीज, सर्वसमावेशक ३-वर्ष/१००,००० किमी वॉरंटी (५ वर्ष/२२०,००० किमीपर्यंत विस्तारित) आणि उद्योग-अग्रणी ८-वर्ष/१६०,००० हायब्रिड बॅटरी वॉरंटी आहे.
