January 19, 2026

सिंबायोसिस युनिव्हर्सिटी ऑफ अप्लाईड सायन्सेस, इंदोर आणि इस्रोच्या संयुक्त विद्यमाने ‘इस्रो प्रदर्शन २०२५ – पृथ्वीपासून तारकांकडे: भारताचा अवकाश प्रवास’

0
IMG-20250826-WA0011
Spread the love

इंदोर, २५ ऑगस्ट २०२५ : सिंबायोसिस युनिव्हर्सिटी ऑफ अप्लाईड सायन्सेस, इंदोर व भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘इस्रो प्रदर्शन २०२५ – पृथ्वीपासून तारकांकडे : भारताचा अवकाश प्रवास’ या विशेष प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. हे प्रदर्शन दिनांक २३ ते २५ ऑगस्ट २०२५ दरम्यान सुपर कॉरिडॉर, विमानतळाजवळ, बडा बांगर्डा, इंदोर, मध्य प्रदेश, सिंबायोसिस युनिव्हर्सिटी विद्यापीठाच्या परिसरात मोठ्या उत्साहात पार पडले.

२३ तारखेला झालेल्या राष्ट्रीय अंतराळ दिवसानिमित्त या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. या प्रदर्शनाला इस्रोचे वरिष्ठ वैज्ञानिक शालिनी गंगेले, दिनेश कुमार अग्रवाल आणि रवीकुमार वर्मा या मान्यवरांनी उपस्थिती लाभली. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना अवकाश क्षेत्रातील विविध पैलूंची सखोल माहिती मिळाली.

भारताच्या अवकाश संशोधनातील अभूतपूर्व कामगिरी, अत्याधुनिक तंत्रज्ञान तसेच नवकल्पनांचा आत्मा यांचा भव्यतेने परिचय करून देण्यात आला. विद्यार्थ्यांना, शिक्षकांना व सर्वसामान्यांना भारताचा अवकाश प्रवास जवळून अनुभवण्याची ही एक अद्वितीय संधी उपलब्ध झाली. शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठातील विद्यार्थी व प्राध्यापक वर्गाने या प्रदर्शनाला मोठी उपस्थिती दर्शवली. प्रवेश सर्वांसाठी मोफत ठेवण्यात आला होता.

यावेळी विनीत कुमार नायर, कुलगुरू, सिंबायोसिस युनिव्हर्सिटी ऑफ अप्लाईड सायन्सेस म्हणाले,” हे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या माध्यमातून राबवण्यात आले होते. इस्रो हे आज सिंबायोसिसच्या माध्यमातून इंदोर मध्ये आले आहे. एकूण ३५०० विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाला भेट दिली. २३ तारखेला झालेल्या राष्ट्रीय अंतराळ दिवसा निमित्त या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये चांद्रयान, आर्यभट्ट उपग्रह, भास्कर, गगनयान, प्रक्षेपित केलेले उपग्रह, ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण वाहन (PSLV), जिओसिंक्रोनस उपग्रह प्रक्षेपण वाहन (GSLV), अंतराळ आणि विज्ञान तंत्रज्ञान, याचे मोठे मॉडेल विद्यार्थ्यंना पाहायला व समजावून घेता आले. या निमित्ताने इस्रोची तांत्रिक टीमने विद्यर्त्यांना मार्गदर्शन केले.”

रवीकुमार वर्मा, इस्रोचे वरिष्ठ वैज्ञानिक म्हणाले,” चांद्रयान ३ च्या माध्यमातून चंद्रावर सॉफ्ट लँडिंग केले होते, चंद्रावर भारताचा झेंडा २ वर्षांपूर्वी लावणारा भारत हा जगातील ४ देश झाला. झेंड्यावर चंद्र तारे असणं आणि चंद्रावर तुमचा झेंडा असणं या मध्ये खूप मोठा फरक आहे.”

दिनेश कुमार अग्रवाल, इस्रोचे वरिष्ठ वैज्ञानिक म्हणाले,” इस्रो आपल्या दारी”, स्पेस ऑन व्हील” या कार्यक्रम अंतर्गत हे प्रदर्शन भरवण्यात आले. कार्यरत उपग्रह मॉडेल, रॉकेट कामाची प्रक्रिया हि विद्यार्थ्यांना जाणून घेता आली. सध्या आपल्या जीवनाच्या प्रत्येक गोष्टीमधें स्टँटलाईटचा वापर कसा केला जातो हे विद्यर्थ्यांना शिकता आले. “

शालिनी गंगेले, इस्रोचे वरिष्ठ वैज्ञानिक म्हणाल्या, ” विक्रम साराभाई अंतराळ प्रदर्शन हे अहमदाबाद, गुजरात मधून इंदोरमध्ये सिंबायोसिसच्या माध्यमातून आणले आहे. या मध्ये इस्रो नक्की काय करते?, आता पर्यंत नक्की काय झाले? दूरदृष्टी, इस्रोमधील महिला सक्षमीकरण याची माहिती विद्यार्थ्यांनी जाणून घेतली.”

सिंबायोसिस युनिव्हर्सिटी ऑफ अप्लाईड सायन्सेसतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, देशातील विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान व संशोधनाविषयी उत्सुकता आणि प्रेरणा निर्माण करणे हा यामागील उद्देश आहे.

ISRO #SpaceExhibition #SymbiosisIndore #NationalSpaceDay #FromEarthToTheStars #ISROExhibition2025 #IndoreEvents

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1200 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी

Call Now Button