January 19, 2026

मनोज दादा जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनानूसार महावितरण भरती प्रक्रिया मध्ये पात्र उमेदवारानां

0
IMG-20250821-WA0050(1)
Spread the love

पुणे: दि. २१ ऑगस्ट २०२५, महावितरण अंतर्गत 2023-2024 वर्षांत जाहिरात क्रं 06/2023 विद्युत सहायक या पदासाठी घेण्यात आलेल्या भरती प्रक्रियेत EWS प्रवर्गातील मुलाच्या निवड प्रक्रियेत Annexure ‘A’ (संलग्नक ‘ए’) हे अनिवार्य आहे त्या कारणास्तव मुलांच्या नियुक्ती होण्यास अडचणी निर्माण होत आहेत त्या करता EWS प्रवर्गातील उमेदवार पात्र करून घेण्यात यावे या करता अखंड मराठा समाज महाराष्ट्र राज्य यांच्या द्वारे निवेदन आदरणीय संघर्ष योद्धा येत असलेल्या अडचणी व समस्या सोडवण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करण्यात यावे या करता दादांनी स्वतः दूरध्वनी द्वारे संपर्क करत मराठा सेवकास आदेश दिला व EWS प्रवर्गातील सर्वच मुलांच्या नियुक्त्या होण्यासाठी सर्वोपरी प्रयत्न करा असे सांगितले. आज त्याच तत्परतेने मराठा सेवकानी मा. आमदार श्री चंद्रकांत दादा पाटील, उच्च तंत्र शिक्षण मंत्री तसेच मराठा समाज उपसमिती अध्यक्ष यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली व निवेदन देत सर्व मजकूर वर सविस्तर चर्चा केली. आज रोजी राज्यातील EWS हा प्रवर्ग संपुष्टात आल्या कारणाने मुलांना हे प्रमाणपत्र देण्यात सर्वच प्रशासकीय अधिकारी असमर्थ आहेत परंतू कागदपत्र पडताळणी मध्ये Annexure ‘A’ (संलग्नक ‘ए’) हे अनिवार्य असल्या कारणांमुळे मुलांच्या नियुक्ती संदर्भात खूप मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. राज्य सरकारने यावरती योग्य तो निर्णय घेऊन त्यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करावे व मुलांच्या भविष्याचा विचार करावा अशी मागणी निवेदनाद्वारे केली गेली आहे. यावर मंत्री महोदयानी मी कॅबिनेट बैठकीत ह्या विषयावर सविस्तर चर्चा करतो आणि उर्जा मंत्रीशी व मुख्यमंत्री यांच्याशी संवाद साधून मुलांच्या भविष्यासाठी ठोस निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिले. यावेळी आपले मराठा सेवक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1200 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी

Call Now Button