January 19, 2026

देवेंद्रजी चारित्र्यसंपन्न, नम्र आणि दूरदृष्टीचे लोकनेते” – ना. चंद्रकांतदादा पाटील.

0
IMG-20250727-WA0036
Spread the love

देवेंद्रजींच्या वाढदिवसानिमित्त मुकुलमाधव फाउंडेशन आणि क्रिएटिव्ह फाउंडेशन तर्फे आरोग्य किट व इतर वस्तू वाटप – संदीप खर्डेकर.

देवेंद्रजी फडणवीस हे चारित्र्यसंपन्न,नम्र आणि दूरदृष्टी असलेले लोकनेते आहेत असे गौरवोदगार ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी काढले. त्यांचे कार्य हे लोकाभिमुख आहे म्हणूनच त्यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने फ्लेक्सबाजी न करता रक्तदान किंवा अन्य सेवाकार्य करण्याचे आवाहन केले आणि त्याचे कार्यकर्त्यांनी तंतोतंत पालन केल्यामुळे विक्रमी रक्त संकलन पार पडले असेही ना.चंद्रकांतदादा पाटील म्हणाले.त्यालाच अनुसरून क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि मुकुलमाधव फाउंडेशन तर्फे 50 संस्थांना आरोग्य किट व इतर उपयुक्त वस्तू भेट देण्यात येत आहे हे कौतुकास्पद असल्याचेही ना. चंद्रकांतदादा म्हणाले. सर्वांनी आपले वाढदिवस अश्या उपक्रमांनी साजरे केले तर त्याचा समाजातील गरजुंना लाभ होईल व त्यांना अधिक सेवाकार्य करता येईल असेही ते म्हणाले.
मुकुलमाधव फाउंडेशन आणि क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या वतीने मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सेवा सप्ताहांतर्गत विविध संस्थांना आरोग्य किट, स्वामी आंगण वृद्धाश्रमास टी व्ही, वामन निवास ज्येष्ठ नागरिक संघास कपाट,तर बाल नवयुग मित्र मंडळ मॉडर्न कॉलोनी,आझाद मित्र मंडळ प्रभात रस्ता,ह्या मंडळाना स्पीकर सेट भेट देण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर, मुकुलमाधव फाउंडेशन चे सचिन कुलकर्णी, प्रदीप चांदेरे,मा. नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या सौ.कल्याणी खर्डेकर, स्वामी आंगण वृद्धाश्रम च्या संचालिका आनंदी जोशी, वामननिवास ज्येष्ठ नागरिक संघाचे सुरेश थिटे, तसेच सनी लांडे, आशिष मोहळ ,सागर थरकुडे ,अजिंक्य बोत्रे,प्रथमेश वरघडे,कुणाल जोगवडे,सचिन पवार,निखिल शिंदे,विशाल गायकवाड
व इतर मान्यवर उपस्थित होते.
देवेंद्रजींच्या आवाहनानुसार क्रिएटिव्ह फाउंडेशन आणि मुकुलमाधव फाउंडेशन ने लोकोपोयोगी साहित्य वाटप करण्याचे ठरविले असे संदीप खर्डेकर म्हणाले.सध्या आरोग्याच्या समस्या मोठ्या प्रमाणावर वाढत असून त्यात ही बीपी व डायबेटीस चे प्रमाण वाढत आहे त्यामुळे 50 संस्थांना आरोग्य किट भेट देण्याचे ठरविले व त्यानुसार ब्लडप्रेशर तपासणी यंत्र, रक्तशर्करा तपासणी यंत्र आणि प्रथमोपचार पेटी भेट देण्यात येत आहे असेही संदीप खर्डेकर म्हणाले.आमच्याकडे विविध कारणांसाठी मदत मागणारे येतात, विविध सण, उत्सव येवढेच नव्हे तर अगदी “आखाड” करायचाय म्हणून आर्थिक मदत मागणारेही येतात, मात्र यापुढे आर्थिक मदत न करता मंडळाच्या परिसरातील नागरिकांना गरजेची असणारी “वस्तुरूपी” मदत करण्याचे आम्ही ठरविले असल्याचे संदीप खर्डेकर म्हणाले.
ज्येष्ठ नागरिक आणि विशेषतः वृद्धाश्रमातील नागरिकांना टीव्ही आणि उपयुक्त असे कपाट भेट देताना आनंद होतं असल्याचे मुकुलमाधव फाउंडेशन चे सचिन कुलकर्णी म्हणाले, तसेच येणाऱ्या काळात ही अश्याच पद्धतीने गरजुंना वस्तुरूपी मदत करण्यात येणार असल्याचेही श्री. कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे संयोजन सौ. मंजुश्री खर्डेकर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1200 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी

Call Now Button