अजूनही मुली व महिलांना स्वसंरक्षणाचे महत्त्व का कळेना ?
रोजच जणू काही नियमितपणे मुली व स्त्रियांवरील अत्यंत गंभीर आणि किळसवाणे अत्याचारांमध्ये वाढ होत आहे ज्याच्या बातम्याही नियमितपणे वाचायला व ऐकायला मिळतात ही अत्यंत्य संवेदनशील बाब म्हणावी लागेल आणि हे राज्य सरकारचे एकार्थी मोठे अपयशच आहे हे कोणीही नाकारू शकत नाही ….राज्यातील एकही गाव,शहर असे नाही की मुली व स्त्रियांवरील किळसवाणे अत्याचारांमध्ये वाढ झाली नाही… फक्त एक मात्र निश्चित होते की ,कोणत्याही मुलीवर किंवा महिलांवर काही अन्याय झाले की राजकीय पक्ष जागे होतात आणि मग निषेध मोर्चे काढण्यात येतात… आरोपींचे फोटोंना काळे फसून प्रतिकात्मक फाशी अथवा ते जाळण्यात येतात हे सर्व दोन, तीन दिवस चालते पुन्हा सर्व आपापल्या मार्गाला लागतात…हे झाले राजकारण ….परंतु मुली व महिलांना हे का कळत नाही की आपणच आपल्या स्वसंरक्षणाला कमी पडलो … आणि त्यामुळे अत्याचारालाही बळी पडलो …. सध्याच्या काळात मुली व महिलांनी कोणत्याही प्रकारच्या अन्यायाला बळी पडायचे नसेल तर यासाठी सर्व प्रथम निरोगी ,सुदृढ राहण्यासाठी सकाळी किंवा संध्याकाळी नियमितपणे व्यायाम हा केलाच पाहिजे…त्यातच अत्याचाराविरोधात सक्षमपणे लढण्यासाठी स्वसंरक्षाचे प्रशिक्षण हे घेतलेच पाहिजे … तरच मुली व महिलांना निर्धास्तपणे या जगात वावरता येईल व आपापले ध्येय निर्धास्तपणे मिळवता येईल,परंतु हे आजही मुली व महिलांना का कळत नाही ? हा प्रश्न निर्माण झाला आहे… याविषयी आजही मुली व महिलांची मानसिकता का बदलत नाही ? या संवेदनशील प्रश्नांमुळे प्रत्येक पालक चिंताग्रस्त आहे कारण …. दिवसाढवळ्या मुलींवर धार धार शस्त्राने वार होतात,गळ्यावर चाकू ठेऊन धमकावले जाते, नोकरीच्या जागी बेदम मारहाण होते, घरात घुसून अत्याचार होतात , प्रवासात अश्लील हावभाव व अश्लील स्पर्श होतात,तरीही काही अपवाद वगळता प्रतिकार केला जात नाही आणि त्या नराधमाला कोणाच्याही मदतीची अपेक्षा न ठेवता त्याच जागी त्याच मुली व महिलांकडून जाग्यावरच चोप दिला जात नाही ….कारण आत्मविश्वास बळकट नाही असेच म्हणावे लागेल…. यासाठीच मुली व महिलांनी स्वसंरक्षाचे प्रशिक्षण घेतले पाहिजे आत्मविश्वास बळकट करून अन्यायाविरोधात लढण्याची क्षमता बाळगली पाहिजे…हे समजून घेण्यासाठी मुलींनी आपली स्वतःची पहिली मानसिकता बदलली पाहिजे …एकवेळ मेकअप व फॅशन आणि काही हानिकारक व्यसन करण्यापेक्षा नियमितपणे व्यायाम व मार्शल आर्ट कलेकडे लक्ष केंद्रित करून निडर व स्वाभिमानी जीवन जगण्यासाठी ठामपणे निर्णय घ्या …आणि कोणत्याही अन्यायाविरोधात लढण्यासाठी सक्षम राहा…हाच संदेश आम्ही सध्याच्या परिस्थितीत मुली व स्त्रियांवरील वाढत्या अन्यायामुळे ” बॉऊंडलेस स्पोर्ट्स असोसिएशनच्या ” वतीने राज्याच्या प्रत्येक अल्प मुली,तरुण तरुणींना देत आहेत….
कळावे आपले लतेंद्र भिंगारे सर, अध्यक्ष, बॉऊंडलेस स्पोर्ट्स असोसिएशन, महाराष्ट्र राज्य…
( कृपया सदर मजकूर मुली व महिलांना स्वसंरक्षणाचे महत्त्व कळावे यासाठी आपण आपल्या लोकप्रिय दैनिकात प्रसिद्ध करण्यात यावा …ही विनंती … 🙏🥋🙏)
