July 2, 2025

Infra.Market या बांधकाम साहित्य उपलब्ध करणाऱ्या भारतातील आघाडीच्या प्लॅटफॉर्मने सक्रिय क्षमतेच्या बाबतीत देशाच्या सिरॅमिकबाजारपेठेत दुसरे स्थान मिळवले आहे.

0
IMG-20250603-WA0018
Spread the love

या विकासामुळे कंपनी क्षमता वाढवून या क्षेत्रात करत असलेला वेगवान विस्तार दिसून आला आहे. त्याचबरोबर कंपनीचे दमदार मल्टी- ब्रँड धोरण, देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील सखोल व्याप्ती अधोरेखित आली आहे. कंपनीची 19 उत्पादन केंद्रे कार्यरत असून त्यांची एकूण उत्पादन क्षमता 81.57 दशलक्ष चौरस मीटर्स आहे. कंपनीच्या एकूण उत्पन्नामध्ये निर्यातीचा वाटा 25 टक्के ते 30 टक्के असून त्यामुळे जागतिक विकासाला चालना मिळत आहे. गेल्या तीन ते चार वर्षांत 5 पट विकास साध्य करत Infra.Market उत्पादनांची आघाडी आणि व्याप्तीसह भारताच्या सिरॅमिक्स क्षेत्राला चालना देत आहे.

Infra.Market च्या टाइल्स विभागात वेगवेगळ्या प्रकारच्या ग्राहकांसाठी विविध खासगी लेबल्सच्या ब्रँड्सचा पोर्टफोलिओ समाविष्ट करण्यात आला आहे. एमसरद्वारे प्रीमियम ग्राहकांना मोठे स्लॅब आणि आर्किटेक्चरच्या आधुनिक गरजा पूर्ण करणारे अद्ययावत फिनिश उपलब्ध करून दिले जाते. आयव्हीएएसद्वारे मास- प्रीमियम क्षेत्राच्या ग्राहकांना सेवा दिली जाते. त्यामध्ये टाइल्स व क्वार्ट्झ उत्पादनांची समतोल श्रेणी समाविष्ट असून ती बजेटबाबत आग्रही असलेल्यांसाठी तसेच मोठ्या प्रकल्पांसाठी योग्य आहे. या पोर्टफोलिओमुळे Infra.Market ला व्यावसायिक प्रकल्प, रियल इस्टेट डेव्हलपर्स, खासगी क्षेत्रातील कंपन्या, ओईएम्स, आर्किटेक्ट्स आणि शहरी व निमशहरी भागातील कंत्राटदारांच्या सेवा पूर्ण करणे शक्य होते.

Infra.Market चे सह- संस्थापक आदित्य शारदा या असामान्य कामगिरीविषयी म्हणाले, ‘टाइल्सच्या बाबतीत भारत प्रमुख जागतिक उत्पादन केंद्र बनला असून त्याचबरोबर देशाने जगातील तिसऱ्या सर्वात मोठ्या सिरॅमिक कॅटेगरी निर्यातदाराचे स्थान मिळवले आहे. आता या बाजारपेठेला फक्त किंमतीद्वारे चालना मिळत नाही, तर डेव्हलपर्सना वेगवान सेवा, प्रीमियम फिनिश आणि वैशिष्ट्यपूर्ण डिझाइन्स हवे असतात. अशा परिस्थितीत आमचे मल्टी- ब्रँड व डिजिटल फर्स्ट डिस्ट्रिब्युशन मॉडेल आघाडी घेते. टाइस विभागाचे कमॉडिटाइज्ड उत्पादनांपासून डिझाइनकेंद्रित उत्पादनांमध्ये रुपांतर होत आहे. देशांतर्गत मागणी इंजिनियर्ड सरफेसेसकडे वळत असताना व्याप्ती, वेग आणि डिझाइन्समधले वैविध्य सिरॅमिक्स क्षेत्रात आघाडी मिळवून देईल असे आम्हाला वाटते.’

दमदार पॅन नेटवर्क असलेल्या Infra.Market कडे 12,000 पेक्षा जास्त वितरकांचे नेटवर्क आहे. यामुळे प्रकल्पाशी संबंधित विक्री वेगाने बाजारपेठेच्या चक्रात बदलते. इंटिग्रेटेड डिमांड प्लॅनिंग, उत्पादन आणि प्रकल्पस्तरीय लॉजिस्टिक्स कंपनीअंतर्गत विकसित करण्यात आलेल्या तंत्रज्ञान उत्पादनांद्वारे केले जात असल्यामुळे कंपनीला प्रत्येक प्रकल्पात अपसेलिंगच्या संधी तयार करता येतात आणि काँक्रीट व एएसी ब्लॉक्सच्या पुरवठ्याद्वारे प्रवेश मिळतो. प्रकल्पाच्या गरजा टाइल्स व सॅनिटरीवेयरपर्यंत विस्तारल्यानंतर कंपनीला त्यांच्या अनोख्या बिझनेस मॉडेलमुळे पसंतीची पुरवठादार असल्याचा फायदा मिळतो.

भारतातील सिरॅमिक टाइल्स बाजारपेठेचा आकार 2023 मध्ये 59,500 कोटी रुपये होता आणि तो 2025 च्या अखेरपर्यंत 70,700 कोटी रुपयांपर्यंत जाईल अशी अपेक्षा आहे. रियल इस्टेट विकास क्षेत्रातील वाढ, रिनोव्हेशनचे वाढते प्रमाण, प्रीमियम सरफेसेसना असलेली मागणी व त्याला पायाभूत सुविधांचा विकास, घरांची मागणी आणि दुसऱ्या व तिसऱ्या श्रेणीतील रियल इस्टेट विकासाची जोड यामुळे सिरॅमिक बाजारपेठेला आणखी चालना मिळत आहे.

Infra.Market ने या क्षेत्रात मिळवलेली आघाडी कंपनीच्या डिझाइन, दर्जा व वाजवी किंमत समाविष्ट करण्याच्या तसेच रियल इस्टेट व बांधकाम क्षेत्राला मूल्य मिळवून देण्याच्या क्षमतेमुळे शक्य झाली आहे.

Infra.Market विषयी

2016 मध्ये सुरू करण्यात आलेला Infra.Market हा बिल्डिंग मटेरियल प्लॅटफॉर्म आहे. आरडीसी काँक्रीट, शालिमार पेंट्स, एमसेर, मिलेनियम टाइल्स, अ‍ॅमस्ट्रॅड आणि इतर कंपन्यांमध्ये करण्यात आलेल्या धोरणात्मक गुंतवणुकीमुळे मिळालेली चालना तसेच 10,000 रिटेल टचपॉइंट्स, 30 पेक्षा जास्त एक्सक्लुसिव्ह फ्लॅगशीप दालने, 250 पेक्षा जास्त उत्पादन केंद्रे यांसह Infra.Market बांधकाम उद्योगाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करत आहे. 15 पेक्षा जास्त उत्पादन प्रकार सहजपणे पुरवणारी ही एकमेव कंपनी असून त्यात काँक्रीट, अ‍ॅग्रीगेट्स, एएसी ब्लॉक्स, स्टील, पाइप्स अँड फिटिंग्ज, एमडीएफ, प्लायवूड, लॅमिनेट्स, टाइल्स, बाथ फिटिंग्ज व सॅनिटरीवेयर, पंखे, लाइट्स, अप्लायन्सेस, मोड्युलर किचन्स, डिझायनर हार्डवेयर व पेंट्स यांचा समावेश आहे.

संकेतस्थळ: www.infra.market

लिंक्डइन: https://www.linkedin.com/company/inframarket/

इन्स्टाग्राम: https://www.instagram.com/infra.market/

फेसबुक: https://www.facebook.com/infra.market/

ट्विटर: https://twitter.com/InfraMarket_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

Call Now Button