July 4, 2025

इंडियन इंस्टिट्यूट ऑफ इंटीरियर डिझाईनर्स पुणे रिजनल चॅप्टर च्या वतीने ‘डिझाईन मेला 2025’ चे आयोजन

0
IMG-20250603-WA0030
Spread the love

12 ते 14 जून दरम्यान विद्यार्थी, व्यावसायिकांना विविध कार्यशाळा, चर्चासत्रात सहभागी होण्याची संधी

पुणे : इंडियन इंस्टिट्यूट ऑफ इंटीरियर डिझाईनर्स च्या पुणे रिजनल चॅप्टर च्या वतीने इंटीरियर डिझाईन च्या विद्यार्थी आणि व्यावसायिकांसाठी ‘डिझाईन मेला 2025’ चे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये तीन दिवस विद्यार्थी, व्यावसायिकांसह सामान्य पुणेकरांनाही सहभागी होता येणार आहे अशी माहिती चेअरमन अजय पंचमतिया यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेला यावेळी संस्थेचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष श्री प्रताप जाधव ,मानद सचिव राजेश पुराणिक, सहसचिव उन्मेष मिस्त्री,खजिनदार हरप्रीत आनंद, समिती सदस्य राजेश कुराडे,सुदिन जायाप्पा,आदित्य आरोळे,विरेंद्र पटेल,के एच राहुल,सुबोध दीक्षित आदि मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना अजय पंचमतिया म्हणाले, महालक्ष्मी लॉन्स, कर्वेनगर,पुणे येथे 12 ते 14 जून 2025 दरम्यान सकाळी 10 ते रात्री 9 यावेळेत ‘डिझाईन मेला 2025’ संपन्न होणार आहे. याचे उद्घाटन ज्येष्ठ उद्योजक प्रतापराव पवार यांच्या हस्ते होणार आहे. इंडियन इंस्टिट्यूट ऑफ इंटीरियर डिझाईनर्स पुणे रिजनल चॅप्टर ही संस्था इंटीरियर डिझाईन,आर्किटेक्चर आणि संबंधित सर्जनशील उद्योग क्षेत्रातील व्यावसायिकांचे प्रतिनिधित्व करणारी एक प्रतिष्ठित संस्था आहे. डिझाईन मेळा हे आमचे प्रमुख प्रदर्शन आहे, ज्याचे उद्दिष्ट डिझाईन जगातील नवीनतम नवकल्पना, शाश्वत डिझाईन उपाय आणि सहयोग प्रदर्शित करणे आहे. हे व्यावसायिक, विद्यार्थी, उद्योग तज्ञ आणि भारताच्या डिझाईन लँडस्केपला आकार देणाऱ्या संस्थांना एकत्र आणते.

‘डिझाईन मेला 2025’ मध्ये इंटीरियर डिझाईनशी संबधित व्यावसायिक त्यांच्या उत्पादनांचे प्रदर्शन करणार आहेत. विद्यार्थ्यांसाठी तीन दिवस विविध विषयावर चर्चा सत्र, कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या आहे. तसेच त्यांना नेटवर्किंगची संधी मिळणार आहे. या कार्यशाळा, चर्चासत्रात सहभागी होण्यासाठी विद्यार्थी व व्यवसायिकांनी नाव नोंदणी आवश्यक आहे. प्रदर्शनाला सामान्य पुणेकर नागरिकही भेट देऊ शकतात, या प्रदर्शनाला भेट देण्यासाठी सर्वांना मोफत प्रवेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

Call Now Button