गानवर्धनतर्फे नेहा महाजन यांना सुचेता नातू स्मृती युवा सतारवादक पुरस्कारगुरुवारी सांगीतिक मैफलीचे आयोजननेहा महाजन यांचे सतारवादन तर कैवल्यकुमार गुरव यांची गायन मैफल

पुणे : गानवर्धन संस्थेच्या वतीने दरवर्षी आयोजित करण्यात येत असलेल्या विशेष सांगीतिक कार्यक्रमात कै. सुचेता नातू यांच्या स्मरणार्थ दिल्या जाणाऱ्या युवा सतारवादक पुरस्काराने नेहा विदुर महाजन यांचा गौरव केला जाणार आहे.
पुरस्कार वितरण समारंभ गुरुवार दि. 29 मे रोजी सायंकाळी 5:30 वाजता एस. एम. जोशी हॉल, नवी पेठ येथे आयोजित करण्यात आला आहे. सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील कार्यरत असलेले सुरेश रानडे व जयश्री रानडे हे या पुरस्काराचे प्रायोजक असून त्यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होणार आहे. दहा हजार रुपये, शाल, सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर नेहा महाजन यांचे सतार वादन होणार आहे. त्या नंतर पंडित कैवल्यकुमार गुरव यांच्या गायन मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. कलाकारांना सुयोग कुंडलकर (संवादिनी), प्रशांत पांडव, विनायक कुडाळकर (तबला) साथसंगत करणार आहेत.
नेहा या पंडित विदुर महाजन यांची कन्या असून त्यांना शाश्वती शहा, रवी गाडगीळ, जुनैन खान यांचे मार्गदर्शन लाभले आहे. सतारवादनासह अभिनय आणि मॉडेलिंग या क्षेत्रात सुद्धा त्यांचा नावलौकिक आहे.
कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.
फोटो : नेहा महाजन, कैवल्यकुमार