ब्रम्हाकॉर्पच्या ‘सन व्हॅली’ प्रकल्पाचा बावधनमध्ये करीना कपूर खानच्या उपस्थितीत भव्य शुभारंभ*खासगी प्लंज पूल, वॉक-इन ड्रेसर्ससह आलिशान घरे; बावधनमध्ये लक्झरी जीवनशैलीचा नवा अध्याय

पुणे, दि. २१ मे – पुण्यातील आघाडीच्या रिअल इस्टेट विकासकांपैकी एक असलेल्या ब्रम्हाकॉर्पने बावधन या वेगाने विकसित होत असलेल्या उपनगरात आपल्या प्रीमियम निवासी प्रकल्प ‘सन व्हॅली’चा भव्य शुभारंभ केला. या विशेष प्रसंगी बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान या अधिकृत ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून उपस्थित होत्या.
‘सन व्हॅली’ हा प्रकल्प विशेषतः कार्य-जीवन समतोलाला प्राधान्य देणारा असून, यामध्ये स्मार्ट स्पेसेस, पॅडल कोर्ट, आउटडोअर को-वर्किंग स्पेसेस, रिलेक्सोलॉजी पार्क, मिनी गोल्फ अशा सुविधा पुरवल्या जाणार आहेत. निवडक 3.5 आणि 4.5 बीएचके घरे खासगी प्लंज पूल व वॉक-इन ड्रेसर्ससह सज्ज असून, ही घरे एका समृद्ध जीवनशैलीचा अनुभव देणारी आहेत.
करीना कपूर खान ह्या आपल्या संतुलित जीवनशैली व व्यावसायिक यशामुळे प्रकल्पाचे उत्तम प्रतिनिधित्व करतात, असे ब्रम्हाकॉर्पने नमूद केले.
बावधनसारख्या पायाभूत सुविधा विकसित होणाऱ्या परिसरात हा प्रकल्प साकारत असून, मुंबई-पुणे एक्सप्रेसवे, कोथरूड, हिंजवडी आणि मध्य पुण्याशी सुलभ कनेक्टिव्हिटी हे या ठिकाणाचे प्रमुख आकर्षण ठरत आहे.
११ एकर भूखंडावर उभारण्यात येणाऱ्या या प्रकल्पात २६ मजली उंच टॉवर्समध्ये २ ते ४.५ बीएचके पर्यंत विविध प्रकारच्या आलिशान निवासस्थानांचा समावेश आहे. हे प्रकल्प केवळ वास्तव्य न राहता, एक संपूर्ण जीवनशैली साकार करणारे ठिकाण ठरणार आहे.
प्रकल्पाच्या उद्घाटनावेळी बोलताना ब्रम्हाकॉर्पचे सह-अध्यक्ष श्री. दिनेश अग्रवाल म्हणाले, “सन व्हॅली हा आमचा सर्वाधिक महत्त्वाकांक्षी आणि सर्जनशील प्रकल्प असून, आम्ही लक्झरी आणि कार्यक्षमतेचा सुंदर संगम येथे साकारला आहे. बावधनचा निसर्गरम्य परिसर ही या प्रकल्पाची आणखी एक जमेची बाजू ठरते.”
या प्रकल्पाच्या जाहिरात मोहिमेसाठी ‘स्केअरक्रो एम अँड सी साची’ ही नामांकित जाहिरात संस्था सहभागी झाली आहे. या संस्थेचे सह-संस्थापक रघु भट यांनी सांगितले की, “सन व्हॅली ही केवळ निवासी योजना नसून ती एक परिपूर्ण जीवनशैली सादर करणारा अनुभव आहे. करीना कपूर खानसारखा अभिजात ब्रँड अॅम्बेसेडर या मोहिमेला वेगळेच स्थान प्राप्त करून देतो.”
सन व्हॅली लवकरच पुण्यातील सर्वात प्रिमियम आणि प्रतिष्ठेचे निवासी पत्त्यांपैकी एक ठरणार असून, ब्रम्हाकॉर्पच्या नावीन्य, दर्जा आणि लक्झरीच्या वचनबद्धतेचे प्रतीक ठरणार आहे.