पुणे मॅनेजमेंट असोसिएशनचा 49वा स्थापना दिन सोहळा मंगळवारी

पुणे मॅनेजमेंट असोसिएशनचा 49वा स्थापना दिन सोहळा मंगळवारी
केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची विशेष उपस्थिती
पुणे : पुणे मॅनेजमेंट असोसिएशनचा 49वा स्थापना दिवस आणि पुरस्कार वितरण सोहळ्याचे मंगळवार, दि. 27 मे रोजी आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रम सायंकाळी 6:30 वाजता ऑटो क्लस्टर, चिंचवड येथे आयोजित करण्यात आला आहे.
आंत्रप्रेन्युअर ऑफ द इयर, वुमेन आंत्रप्रेन्युअर, फर्स्ट जनरेशन आंत्रप्रेन्युअर, एनजीओ विथ सोशल इम्पॅक्ट, स्टुडस्टंस् चॅप्टर ऑफ द इयर, ॲकॅडमिक इन्स्टिट्यूट, इन्क्युबेटर ऑफ द इयर अशा एकूण नऊ विभागांमध्ये पुरस्कार दिले जाणार आहेत.
केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ विशेष निमंत्रित असून ‘सकाळ’चे संपादक सम्राट फडणीस यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. सॅप पार्टस्चे कार्यकारी संचालक प्रसाद कुलकर्णी आणि ॲकॅडेमिक अलायन्सचे ऋषिकेश धांडे प्रमुख वक्ते आहेत, अशी माहिती पुणे मॅनेजमेंट असोसिएशनचे प्रदीप तुपे यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे. उद्योजक, व्यावसायिक आणि कॉर्पोरेट क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तींसाठी हा कार्यक्रम उपयुक्त आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.