July 4, 2025

ऐतिहासिक छोटा शेख सलाहुद्दीन दर्ग्याच्या उत्सव उद्या पासून 

0
IMG-20250429-WA0018
Spread the love


पुणे : कसबा पेठ येथील सुमारे सातशे वर्षांपूर्वीचा ऐतिहासिक छोटा शेख सलाहुद्दीन दर्ग्याचा उत्सव उद्या (दि. ३० एप्रिल) पासून सुरू होत आहे. सहा दिवस चालणाऱ्या या उत्सवाचे हजरत ख्वाजा मखदूम शेख सलाउद्दीन चिस्ती निजामी अलगारी सिद्दिकी ( रहे ) ट्रस्टच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे. उत्सवाचे यंदाचे 687 वी वर्ष आहे. पुरातन परंपरेनुसार यंदाच्या वर्षी देखील या दर्ग्याला नाचणीच्या भाकरीचा नैवेद्य हिंदू धर्मीय असलेल्या अमित देवरकर कुटुंबीयांकडून दाखवला जाणार आहे.

हा दर्गा सुमारे 700 वर्षापासून हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून परिसरामध्ये प्रसिद्ध. आपले नवस पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी हजारो नागरिक जरब टोचण्याचे काम करतात, यात प्राधान्याने 60% पेक्षा अधिक लोक हे हिंदूधर्मीय असतात हे विशेष आहे.

ऐतिहासिक छोटा शेख सलाहुद्दीन दर्ग्याला दिवाबत्तीची सोय व्हावी व त्यांच्या धार्मिक विधींचा खर्च व्हावा यासाठी छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचे नंतर श्रीमंत पेशवे यांच्याकडून त्या त्या वेळी मोठ्या प्रमाणात देणग्या देण्यात आलेल्या आहे. याचे ऐतिहासिक दस्तावेज सुद्धा उपलब्ध आहेत. छत्रपती शिवाजी महाराज व श्रीमंत पेशवे यांनी दिलेल्या देणग्या यावरून या दर्ग्याच्या अनुषंगाने सर्व धर्मीयांची श्रद्धा असल्याचे स्पष्ट होत आहे.

यंदाच्या वर्षी परचम कुशाई , संदल शरीफ , महेफिले समा, रातीबुल रिफाई , जरब टोचणे , छट्टी शरीफ व खीर प्रोग्रॅम तसेच बहारदार कव्वालीचे आयोजन करण्यात आलेले आहे. हा संपूर्ण कार्यक्रम मौलाना अबुल कलाम आझाद फ्रेंड सर्कल व कसबा पेठ मुस्लिम जमात यांच्या संयुक्त विद्यमाने साजरा केला जातो. या उत्सवात जास्तीत जास्त नागरिकांनी आनंदाने सहभागी व्हावे असे आवाहन हजरत ख्वाजा मखदूम शेख सलाउद्दीन चिस्ती निजामी अलगारी सिद्दिकी ( रहे ) ट्रस्टच्या वतीने तसेच उत्सव समितीचे ताजुद्दीन शेख , शाकिर शेख , मुनाफ शेख यांच्या वतीने करण्यात येत आहे.

तरी सदर बातमी आपले लोकप्रियही दैनिकांतुन प्रसिद्ध व्हावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

Call Now Button