July 4, 2025

शातिर The Beginning’ या मराठी चित्रपटाचा टीजर प्रदर्शित; 23 मे रोजी चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला

0
IMG-20250429-WA0010
Spread the love

करायला अट्टल गुन्हेगारांची “खातीर”…  घेऊन आलो आहोत, जबरदस्त शातीर…!!! अशा हटके टॅग लाईनमुळे सर्वांचे लक्ष वेधून घेणाऱ्या ‘शांतिर The Beginning या मराठी चित्रपटाचा टीजर नुकताच सोशल मिडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे. संवेदनशील विषयावर बेतलेला, सस्पेन्स थ्रीलर ‘शांतिर The Beginning ‘ आजच्या तरुणाईची कथा सांगणारा असल्याचे टीजर मधून दिसते. हा चित्रपट येत्या 23 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

शातिर The Beginning या चित्रपटाची निर्मिती श्रीयांश आर्ट्स अँड मोशन पिक्चर्स या बॅनरखाली रेश्मा वायकर यांनी केली असून या चित्रपटाद्वारे सुनील सुशीला दशरथ वायकर यांनी दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले आहे. शातिर The Beginning च्या टीजर वरून  दिसते की हा आजच्या तरुणाईची कथा सांगणारा चित्रपट असून कॉलेज तरुणाई मध्ये वाढत असलेल्या अंमली पदार्थाच्या व्यसनांवर भाष्य करणारा असल्याचे दिसतो. पोलिसांवर हल्ला करून पसार झालेला ड्रग्ज माफिया कोण ?  पोलिस  या ड्रग्ज माफिया चा शोध घेण्यात यशस्वी ठरणार का? आणि नायिकेची या सर्व प्रकरणात  भूमिका नेमकी काय? हे जाणून घेण्याची उत्कंठा शातिर The Beginning  चा टीजर वाढवतो. 

चित्रपटाबद्दल बोलताना दिग्दर्शक सुनील वायकर म्हणाले, शांतिर The Beginning माझा दिग्दर्शक म्हणुन पाहिलाच प्रयत्न आहे. समाजातील अंमली  पदार्थाच्या सेवनामुळे होणारी व्यसनाधीनता आणि त्यामुळे वाढणारी गुन्हेगारी त्या विरुद्धचा कॉलेज मधील विद्यार्थ्यांचा लढा या चित्रपटातून दाखवून एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे.

या चित्रपटात रेश्मा वायकर या प्रमुख भूमिकेत असून त्यांच्यासह योगेश सोमण, रमेश परदेशी,मीर सरवर, अनिल नगरकर, अभिमन्यू वायकर, वेद भालशंकर, अॅड. रामेश्वर गिते, गौरव रोकडे, निशांत सिंग, मनोज चौधरी यांच्या महत्वपूर्ण भूमिका शातिर The Beginning  मध्ये आहेत. 

येत्या 23 मे 2025 रोजी शातिर The Beginning हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

Call Now Button