July 4, 2025

अक्षय्य हिंदू पुरस्कार समिती तर्फे आयोजन : पद्मश्री पुरस्कार विजेते चैत्राम पवार यांची उपस्थिती

0
IMG-20250428-WA0015
Spread the love


अक्षय्य हिंदू पुरस्कार वितरण सोहळा शनिवारी (दि. ३ मे)

अक्षय्य हिंदू पुरस्कार समिती तर्फे आयोजन : पद्मश्री पुरस्कार विजेते चैत्राम पवार यांची उपस्थिती

पुणे : हिंदू हितासाठी कार्य करणाऱ्या देशभरातील कार्यकर्त्यांना हयूमनिस्ट युनियन ट्रस्ट तर्फे ‘अक्षय्य हिंदू पुरस्काराने’ गौरविले जाते. यंदा हा पुरस्कार वितरण सोहळा शनिवार, दिनांक ३ मे रोजी सायंकाळी ६ वाजता स. प. महाविद्यालयातील लेडी रमाबाई हॉल येथे होणार आहे. यावेळी पद्मश्री पुरस्कार विजेते चैत्राम पवार हे उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती समितीचे तुषार दामगुडे यांनी दिली.

कार्यक्रमाचे संयोजन तुषार दामगुडे, शेफाली वैद्य यांसह स्नेहल कुलकर्णी, अमोल शुक्ला, रीषभ परदेशी, निलेश भिसे, हर्षल गरुड, सारिका वाघ, महेश पवळे, श्रीनिवास निगडे, लोकेश कोंढरे, स्वप्नील तळेकर, निलेश धायरकर आदींनी केले आहे.

यंदाचा मुख्य पुरस्कार पराग दिवेकर गुरुजी यांना हिंदू एकतेच्या कार्याकरिता, अर्चना तिवारी यांना पत्रकार म्हणून, वर्षा परचुरे यांना जनजाती कल्याण कार्याकरिता, अविनाश तायडे यांना धर्म जागरण करिता, तसेच अश्विन संपतकुमारन यांना गोपालन यासाठी देण्यात येणार आहे. तसेच वै. शिरीष महाराज मोरे यांना मरणोत्तर विशेष पुरस्कार प्रदान करण्यात येईल. अन्यायाविरुद्ध लढण्याच्या तयारीत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती, अकरा हजार रुपये रोख आणि राष्ट्रवादी विचारांच्या लेखकांच्या पुस्तकांचा संच असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

कार्यक्रमात पुरस्कारार्थींची मुलाखत व चैत्राम पवार यांचे व्याख्यान देखील होणार आहे. हिंदुत्वाचे विविध आयाम आहेत. गोपालन, सामाजिक समरसता, धर्म जागृती, वनवासी कल्याण, लोकशिक्षण अशा विविध क्षेत्रांमध्ये देशभर अनेक कार्यकर्ते निस्वार्थपणे काम करतात. अशा कार्यकर्त्यांना पुरस्कार देऊन समितीतर्फे सन्मानित केले जाते. पुरस्कार वितरण सोहळ्याचे यंदा तिसरे वर्ष आहे.

सामाजिक कार्य करत असलेले धायरीतील शिववंदना मित्रपरिवार व न्यू आर्या फाऊंडेशन यांना ‘सांगाती ट्रस्ट’ तर्फे डॉ. सुजित निलेगावकर एक रुग्णवाहिका त्याच दिवशी प्रदान करतील. हा कार्यक्रम विनामूल्य खुला असून पुणेकरांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

Call Now Button