स्पंदने मनाची’ : मराठी गझल गायनाचा कार्यक्रम शुक्रवारी

पुणे : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याचे निमित्त साधून अन्वर कुरेशी आणि स्वरसंगत फाऊंडेशनतर्फे ‘स्पंदने मनाची’ हा मराठी गझल गायनाचा कार्यक्रम शुक्रवारी आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रम दि. 2 मे रोजी सायंकाळी 6 वाजता एस. एम. जोशी सभागृहात होणार आहे. कविवर्य सुरेश भट आणि इतर मान्यवर कलाकारांच्या गझल ज्येष्ठ गझलगायक अन्वर कुरेश आणि त्यांचे शिष्य बाळासाहेब सावंत, मीना जोगळेकर, हेमा सावंत सादर करणार आहेत. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.
फोटो : अन्वर कुरेशी