January 19, 2026

लक्ष्मीबाई दगडूशेठ दत्तमंदिरात वासंतिक पुष्पोत्सवानिमित्त २५ लाख फुलांची आरासलक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई यांच्या पुण्यतिथीनिमित्त कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्ट तर्फे आयोजन

0
IMG-20250427-WA0042
Spread the love


पुणे : रंगीबेरंगी फुलांनी सजलेला सभामंडप… शोभिवंत फुलांची आरास… सुवासिक फुलांनी साकारलेले विविध हार… मोग-याच्या फुलांचा पोशाख आणि गुलाब, झेंडू, चाफा यांसारख्या तब्बल २५ लाख फुलांची सजावट बुधवार पेठेतील लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिरात करण्यात आली. वासंतिक पुष्पोत्सवानिमित्त सत्तू अमावस्येला करण्यात येणारी फुलांची आरास पाहण्याकरिता पुणेकरांनी मोठी गर्दी केली.

कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे संस्थापिका लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई यांच्या पुण्यतिथीनिमित्त पुष्पोत्सवाचे आयोजन करण्यात आले. यावेळी दत्तमंदिर ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र बलकवडे, कार्यकारी विश्वस्त अ‍ॅड. प्रताप परदेशी, खजिनदार अ‍ॅड. रजनी उकरंडे, उत्सव प्रमुख सुनिल रुकारी, उत्सव उप प्रमुख अक्षय हलवाई, विश्वस्त महेंद्र पिसाळ, अ‍ॅड. शिवराज कदम जहागिरदार, डॉ. पराग काळकर, युवराज गाडवे आदी उपस्थित होते. चैत्र महिन्यातील विशेष प्रसाद म्हणून कैरीची डाळ, पन्हे वाटप करण्यात आले. हलवाई परिवारातर्फे पारंपरिक लघुरूद्र करण्यात आले.

पुष्पोत्सवाबाबत माहिती देताना अध्यक्ष राजेंद्र बलकवडे म्हणाले, मंदिरात यंदा २५ लाख फुलांची आरास करण्यात आली आहे. त्यामध्ये १२५ किलो मोगरा, २०० किलो झेंडू, १०० किलो गुलाब, गुलछडी, लिली फुले, ५० हजार चाफा फुले, जाई-जुई आणि पासलीच्या पानांनी पुष्पोत्सवात सजावट करण्यात आली. सरपाले फ्लॉवर्सचे सुभाष सरपाले आणि ५० सहका-यांनी ही आरास साकारली.

श्रीपाद श्रीवल्लभ, नृसिंह सरस्वती, श्रीमत् वासुदेवानंद टेंभेस्वामी महाराज, श्रीमाणिकप्रभू महाराज या दत्तमहाराजांच्या चार अवतारांच्या प्रतिमा आणि कै.लक्ष्मीबाई आणि दगडूशेठ हलवाई यांच्या प्रतिमा देखील फुलांनी सजविण्यात आल्या आहेत. सोमवार, दि.२८ एप्रिल पर्यंत ही आरास भाविकांना पाहण्यास खुली आहे.

  • फोटो ओळ : कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे सत्तू अमावस्येला मंदिराच्या संस्थापिका लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई यांच्या पुण्यतिथी निमित्त दत्तमंदिरात वासंतिक पुष्पोत्सवाचे आयोजन करण्यात आले. यावेळी २५ लाख फुलांची केलेली आकर्षक सजावट.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1200 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी

Call Now Button