पुणे , दि. ३ ( प्रतिनिधी) – जनसेवेचा वसा घेऊन राजकारणामध्ये आलेल्या नगरसेवक सुरज लोखंडे यांनी जनता वसाहत पर्वती पायथा येथे आयोजित केलेल्या महाआरोग्य शिबिराचा जनता वसाहत आणि पर्वती परिसरातील हजारो नागरिकांनी लाभ घेतला, तसेच या शिबिरामध्ये महापालिका आणि राज्य सरकारच्या विविध आरोग्य विषयक योजना नागरिकांना लाभ देण्यात आला.
नगरसेवक सुरज लोखंडे यांच्यातर्फे आपला चौक जनता वसाहत पर्वती पायथा येथे 3 ऑक्टोबर ते 12 ऑक्टोबर या कालावधीमध्ये महारोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी या शिबिराचे हजारो नागरिकांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन झाले. विविध प्रकारच्या मोफत आरोग्य तपासण्या करण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
आरोग्य शिबिरा संदर्भात नगरसेवक सुरज लोखंडे म्हणाले, माझ्या प्रभागातील नागरिकांना आरोग्य विषयक कोणत्याही समस्या येऊ नये यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे . लोकांच्या आशीर्वादाने मी नगरसेवक झालो आहे त्यामुळे त्यांची सेवा करणे माझे कर्तव्य आहे. पुणे महापालिका आणि महाराष्ट्र राज्य सरकार यांच्या विविध आरोग्य जनांचा सर्वसामान्य नागरिकांना कशाप्रकारे फायदा होऊ शकतो मी प्रयत्नशील आहे. जनता वसाहतीमध्ये एक सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल तसेच ई लर्निंग स्कूलची आवश्यकता आहे मी एक जनतेचा सेवक म्हणून महापालिका सभागृहांमध्ये जनतेच्या विविध प्रश्नांचा संदर्भात आवाज उठवत असून या संदर्भातही मी पाठपुरावा करत राहणार आहे.
नेत्र तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, रेडिएशन, इसी जी, दंतरोग तपासणी ,महिलांसाठी स्तनाचा कर्करोग, ऑर्थोपेडिक शस्त्रक्रिया, केमोथेरपी ,विविध प्रकारच्या रक्ता तपासण्या अशा 24 विविध प्रकारच्या वेदना आणि 29 आजार यांसंदर्भात तपासणी आणि शस्त्रक्रियांचा नागरिकांनी या शिबिरामध्ये लाभ घेतला . पुणे महापालिकेच्या स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजित दादा पवार शहरी गरीब योजना एनसीएमसी स्मार्ट कार्ड दहा रुपयात आधार कार्ड चे स्मार्ट कार्ड या शिबिरामध्ये नागरिकांना करून देण्यात आले. विविध तपासण्या बरोबरच नागरिकांना मोफत आयुष्मान कार्ड मोफत सुवर्ण प्राशन संस्कार मोफत वॉकर आधार काठी कुबड्यांचे वाटप मोफत श्रमानंतर वाटप तसेच मोफत बाथरूम चेअर चे वाटप करण्यात आले.
प्लॅटिनम मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल वारजे ,डॉक्टर दूधभाते नेत्रालय रेटिना सेंटर, साई जनसेवा प्रतिष्ठान यांनीही या शिबिरामध्ये सहभाग घेतला.