पद्मश्री जयमालाबाई शिलेदार स्मृती संगीत नाट्य प्रवेश स्पर्धाशिवमंगल स्वरनाट्य संघ आणि शब्दनादला प्रथम क्रमांक


पुणे : एकपात्री कलाकार परिषद, राष्ट्र सेवा दल, निळू फुले कला अकादमी, कलांगण अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने पद्मश्री जयमालाबाई शिलेदार यांच्या जन्म शताब्दीनिमित्त घेण्यात आलेल्या संगीत नाट्य प्रवेश स्पर्धेत संगीतमय प्रवेश गटात शिवमंगल स्वरनाट्य संघाने सादर केलेल्या ‘मदनाची मंजिरी’ तर गद्य प्रवेश गटात शब्दनादच्या ‘वीज म्हणाली धरतीला’ या प्रवेशाला प्रथम क्रमांक मिळाला.
दांडेकर पुलाजवळील राष्ट्र सेवा दलाच्या बॅ. नाथ पै सभागृहात दि. ३ आणि दि. ४ रोजी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे पारितोषिक वितरण आज (दि. ४) झाले. पं. सुरेश साखवळकर, विजयकांत कुलकर्णी, दिवाकर सागर, दीपक रेगे, पपीचंद श्रीश्रीमाळ, सरिता रत्नाकर दिवाकर, प्रदीप रास्ते, अस्मिता चिंचाळकर, संजय गोसावी मंचावर होते. स्पर्धेचे परिक्षण संजय गोगटे आणि कविता मेहेंदळे यांनी केले. पुण्यासह महाराष्ट्राच्या विविध भागातून १७ संघांनी सहभाग घेतला होता.
सुरेश साखवळकर म्हणाले, संगीत रंगभूमीची महाराष्ट्राला वैभवशाली परंपरा लाभली आहे. ही परंपरा कायम राखण्यासाठी रसिकांनी मदतीचा हात देणे आवश्यक आहे. संगीत नाटकाची पालखी प्रत्येकाने वाहून नेण्याची गरज आहे.
विजयकांत कुलकर्णी म्हणाले, संगीत नाट्यकलेला रसिकांचे कोंदण लाभणे आवश्यक आहे. संगीत नाटक नव्या पिढीपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. परिक्षकांच्या वतीने कविता मेहेंदळे यांनी मनोगत व्यक्त केले. संजय गोसावी यांनी प्रास्ताविकात स्पर्धेविषयीची भूमिका स्पष्ट केली. पल्लवी परब यांनी सूत्रसंचालन केले.
स्पर्धेचा सविस्तर निकाल :
संगीतमय प्रवेश विभाग : प्रथम : शिव मंगल स्वरनाट्य (मदनाची मंजिरी), द्वितीय : अबीर इव्हेंटस्‌ (अमृतसिद्धी), तृतीय : कलाप्रीत्यर्थ (मानापमान).
संगीत नाटकातील गद्य प्रवेश : प्रथम : शब्दनाद (वीज म्हणाली धरतीला), द्वितीय : साद संघ (प्रीतीसंगम), तृतीय : रसिकरंजन (कुलवधू).
उत्कृष्ट गायक : विद्यानंद देशपांडे (सुवर्णतुला). आदित्य भोसले (संशयकल्लोळ). उत्कृष्ट गायिका : अवनी परांजपे (मदनाची मंजिरी), सुकन्या जोशी-संत (मानापमान).
उत्कृष्ट अभिनय : तेजस मिस्त्री (सुवर्णतुला), आद्या देशपांडे (सुवर्णतुला), सुहास संत (कुलवधू), शुभांगी मांडे (वीज म्हणाली धरतीला).
उत्कृष्ट साथीदार : सचिन आराध्ये, श्रेयस कुलकर्णी.

फोटो ओळ : पद्मश्री जयमालाबाई शिलेदार जन्म शताब्दीनिमित्त घेण्यात आलेल्या संगीत नाट्य प्रवेश स्पर्धेत यश संपादन केलेल्या कलाकारांसह मान्यव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button