संपूर्ण भारतात सणासुदीचा उत्साह वाढत असताना नवीन स्लाव्हिया ग्राहकांसाठी अधिक प्रगत डिझाइन, तंत्रज्ञान, आरामदायीपणा आणि सुरक्षितता घेऊन आली आहे
सणासुदीचा काळ सुरु होण्यासह नवीन स्लाव्हियाच्या उत्पादनाची सुरुवात करण्यात आली आहे, जिथे ग्राहक मोठ्या प्रमाणावर खरेदी करतात.
नवीन स्लाव्हिया अधिक आकर्षक डिझाइन, अत्याधुनिक तंत्रज्ञान, आरामदायी सुविधा आणि प्रगत सुरक्षा वैशिष्ट्यांसह सेदानच्या यशस्वी प्रवासाला पुढे नेते.
भारतात लाँच झाल्यापासून आतापर्यंत जवळपास ८०,००० स्लाव्हिया सेदानची विक्री झाली आहे आणि सेगमेंटमध्ये या सेदानचे प्रमाण जवळपास ३० टक्के आहे.
पुणे, सप्टेंबर २८, २०२६: स्कोडा ऑटो फोक्सवॅगन इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने (एसएव्हीडब्ल्यूआयपीएल) पुण्यातील चाकण येथील आपल्या जागतिक दर्जाच्या प्लांटमध्ये नवीन स्कोडा स्लाव्हियाचे उत्पादन सुरू केले आहे, जो ग्रुपच्या भारतातील प्रवासातील महत्त्वाचा टप्पा ठरला आहे. भारतात सणासुदीचा हंगाम सुरू होण्यासह पॅसेंजर वेईकल मार्केटमध्ये खरेदीचा उत्साह असताना नवीन स्लाव्हियाच्या उत्पादनाची सुरुवात करण्यात आली आहे. नवीन स्लाव्हिया भारतातील अत्यंत लोकप्रिय सेदानच्या यशावर आधारित आहे, जी ग्राहकांसाठी अधिक प्रगत डिझाइन, तंत्रज्ञान, आरामदायीपणा आणि सुरक्षितता घेऊन आली आहे.
नवीन स्लाव्हिया आपल्या यशस्वी सेदान परंपरेचा विस्तार करते, ज्या अंतर्गत आजपर्यंत जवळपास ८०,००० युनिट्सची विक्री झाली आहे. ही वेईकल भारतातील ग्राहकांच्या गरजांची सखोल जाण आणि युरोपियन इंजिनिअरिंगचा परिपूर्ण संगम साधण्याचा स्कोडा ऑटोचा दृष्टिकोन अधिक पुढे घेऊन जाते, तसेच देशातील ब्रँडचा सेदान पोर्टफोलिओ अधिक दृढ करते.
स्कोडा ऑटोचे चीफ प्रोडक्शन ऑफिसर आंद्रियास डिक म्हणाले, “भारत स्कोडा ऑटोसाठी अधिक महत्त्वाचे उत्पादन केंद्र आणि आमच्या जागतिक उत्पादन नेटवर्कचा अविभाज्य भाग बनले आहे. गेल्या काही वर्षांत आम्ही येथे स्थानिक कौशल्याची स्कोडा ऑटोचा दर्जा, कार्यक्षमता आणि इंजिनिअरिंगच्या जागतिक मानकांशी सांगड घालत मोठी क्षमता निर्माण केली आहे. नवीन स्लाव्हियाच्या उत्पादनाची सुरुवात याच क्षमतांचे आणखी एक उत्तम उदाहरण आहे आणि आमच्या जागतिक कामकाजातील भारताचे धोरणात्मक महत्त्व पुन्हा एकदा दर्शवते. आम्हाला आमच्या भारतातील उत्पादन क्षमतांच्या निरंतर विकासावर आणि स्कोडा ऑटोच्या आंतरराष्ट्रीय वाढीतील त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानावर विश्वास आहे.”
स्कोडा ऑटो फोक्सवॅगन इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे मॅनेजिंग डायरेक्टर व सीईओ पियुष अरोरा म्हणाले, “नवीन स्लाव्हियाच्या उत्पादनाची सुरुवात आमच्या भारतातील प्रवासातील महत्त्वाचा टप्पा आहे, ज्यामधून देशातील आमच्या विकास आणि उत्पादन क्षमतांची ताकद दिसून येते. स्लाव्हियाने आकर्षक डिझाइन, ड्रायव्हिंग गतीशीलता, सुरक्षितता आणि उत्कृष्ट इंजिनिअरिंग यांद्वारे ग्राहकांमध्ये दृढ स्थान निर्माण केले आहे. नवीन मॉडेल तंत्रज्ञान, आरामदायीपणा आणि सुविधेतील महत्त्वाच्या सुधारणांसह याच क्षमतांना अधिक दृढ करते. पुण्यात उत्पादन सुरू झाल्यामुळे आम्ही स्लाव्हियाची अद्ययावत आवृत्ती ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी उत्सुक आहोत आणि स्कोडाकडून अपेक्षित असलेला दर्जा व उत्कृष्ट इंजिनिअरिंग सातत्याने देत राहू.”
स्कोडा ऑटो इंडियाचे ब्रँड डायरेक्टर आशिष गुप्ता म्हणाले, “गेल्या ९० हून अधिक वर्षांपासून सेदान आमच्या जागतिक वारशाचा अविभाज्य भाग राहिली आहे. नवीन स्लाव्हिया हा वारसा अभिमानाने पुढे नेते. या सेगमेंटमध्ये जवळपास ३० टक्के भागासह, स्लाव्हियाने भारतातील ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे. नवीन स्लाव्हिया ग्राहकांना आवडणाऱ्या प्रत्येक घटकाला अधिक उच्च पातळीवर नेते, ज्यामध्ये क्लासिक डिझाइन, युरोपियन इंजिनिअरिंग, सुरक्षितता, सर्वोत्तम कार्यक्षमता, आधुनिक तंत्रज्ञान आणि अधिक आरामाचा परिपूर्ण संगम आहे. आम्ही नवीन स्लाव्हियाचे उत्पादन सुरू करत असताना भारतातील ग्राहकांसाठी आकर्षक, सुसंगत आणि प्रेरणादायी वेईकल सादर करून स्कोडाचा भारतातील सेदान वारसा अधिक दृढ करण्याप्रती आमच्या कटिबद्धतेला पुन्हा निदर्शनास आणत आहोत.”
सणासुदीच्या हंगामासाठी नवीन स्लाव्हिया
नवीन स्लाव्हिया युरोपियन इंजिनिअरिंग आणि ५-स्टार ग्लोबल एनसीएपी सुरक्षा मानक सातत्याने प्रदान करत आहे. आता यात १.० टीएसआय इंजिनसोबत नवीन एट-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक ट्रान्समिशन देण्यात आले आहे.
आराम आणि सोयीसुविधा अधिक उंचावत या नवीन मॉडेलमध्ये सेगमेंटमधील पहिले रिअर सीट मसाज फंक्शन, ३६०-डिग्री एरिया व्ह्यू कॅमेरा आणि गुगल क्लाउड-संचालित एआय कम्पॅनियन असलेले नेक्स्ट-जनरेशन इन्फोटेन्मेंट सादर करण्यात आले आहे. या मॉडेलमध्ये सर्वोत्तम ड्रायव्हिंग गतीशीलता, उपयुक्तता आणि सुरक्षिततेचे संयोजन कायम ठेवण्यात आले आहे, ज्याने भारतातील सेदान ग्राहकांमध्ये या वेईकलचे स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे.
भारतातील उत्पादन आणि इंजिनिअरिंग क्षमतांचे सक्षमीकरण
नवीन स्लाव्हियाच्या उत्पादनाची सुरुवात भारतातील एसएव्हीडब्ल्यूआयपीएलच्या प्रस्थापित उत्पादन क्षमतांना दर्शवते. वार्षिक ३,१५,००० युनिट्सची एकत्रित क्षमता असलेल्या दोन उत्पादन केंद्रांच्या माध्यमातून कंपनीने २०२५ मध्ये स्थानिक पातळीवर उत्पादित केलेल्या २ दशलक्ष वेईकल्सचा महत्त्वपूर्ण टप्पा पार केला. आपल्या “मेड इन इंडिया फॉर इंडिया अँड द वर्ल्ड” दृष्टिकोनांतर्गत कंपनीने ४० हून अधिक देशांमध्ये ७,२५,००० हून अधिक वेईकल्सची यशस्वी निर्यात केली आहे.
पुण्यातील विस्तारलेल्या टेक्नॉलॉजी सेंटरच्या पाठबळामुळे ही परिसंस्था भारतातील व जागतिक बाजारपेठांसाठी आवश्यक स्थानिकीकरण, नाविन्यता आणि उत्पादनांचे रुपांतर करण्याच्या एसएव्हीडब्ल्यूआयपीएलच्या क्षमतांना अधिक दृढ करते, तसेच फोक्सवॅगन ग्रुपच्या जागतिक ऑपरेशन्समधील भारताची भूमिका अधिक प्रबळ करते.