राज्यात ‘पाण्याचे दुर्भीक्ष्य व दुष्काळाचे सावट’ लक्षात घेता, नाशिक येथील कुंभ_मेळा साधेपणात करावा…

  • काँग्रेस प्रवक्ते गोपाळदादा तिवारी
    पुणे दि ४ –
    देशातील व विशेष करून महाराष्ट्रातील दुष्काळी परीस्थिती व पाण्याचे दुर्भिक्ष्य लक्षात घेता, नाशिक येथील कुंभ मेळा साधेपणात केला जावा व वाचणारा खर्च लाखोंचा पोशिंदा बळीराजा व त्याची शेती वाचवण्यासाठी, पाण्याचे नियोजन इ. साठी व्हावा अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस’चे वरीष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी निवेदनाद्वारे केली.
    ते पुढे म्हणाले की, २०२६ च्या खरीप हंगामासाठी महाराष्ट्र सरकारने सुरुवातीला २५ सप्टेंबर २०२६ रोजी ३५८ पैकी २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला. हा निर्णय दुष्काळ व्यवस्थापन संहिता, २०१६ मधील Trigger-1 निकषांनुसार घेण्यात आला. मात्र ३० सप्टेंबर २०२६ रोजी आणखी ४३ तालुक्यांचा समावेश करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ उपसमितीने घेतल्याचे ताज्या वृत्तात आहे. त्यामुळे सध्याचा आकडा ३०८ तालुके असा होतो.
    जर ३५८ पैकी ३०८ तालुके दुष्काळग्रस्त असतील तर राज्यातील सु ९०% भाग हा दुष्काळग्रस्त आहे. त्यामुळे ३१ आक्टों पासुन सुरु होणारा नाशीक येथील कुंभमेळा, राज्यातील पाण्याचे दुर्भीक्ष्य, शेतकरी बांधवांवरील संकट व राज्याची आर्थिक स्थिती पहाता अत्यंत साधेपणात होण्याची काळाची गरज आहे व या विषयी तातडीने “२ दिवसीय अघिवेशन वा विरोधकांसह सर्वपक्षीय बैठक” सत्तेतील महायुती सरकारने बोलवावी व कुंभमेळा बाबत महाराष्ट्रातील प्राप्त परीस्थितीचे गांभीर्य विषद करणारे प्रकटीकरण देश पातळीवर करावे अशी मागणी केली.
    कारण एकवेळ पैसा बाहेरुन वा केंद्र सरकार कडून घेता येईल, मात्र नाशिक / त्रंब्यकेश्वर येथील गोदावरी नदी वा कुशावर्त कुंडात “पाण्याचा स्त्रोत” मोठ्या प्रमाणावर लागणार असुन, राज्यातील धरणांची पातळी व उपलब्ध पाण्याचा साठा आहे त्या लोकसंख्ये साठी पुरेसा नसतांना, पाण्याचा वापर अत्यंत काळजी पुर्वक करणे ही राज्यातील प्राप्त-परीस्थितीची व काळाची गरज असल्याचे ही राज्य काँग्रेसचे वरीष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे..!
    —————————-///——–
    मा संपादक – दै वृत्तसंस्था,
    स. न. वि. वि.,
    कृपया वरील वृत्तांत आपल्या लोकप्रिय वर्तमानपत्रातून प्रकाशित करावा ही विनंती.
    आपला,
    (भूपाळ पंडित)
    9730384211
    द्वारा – “गोपाळदादा तिवारी – सदस्य, महात्मा गांधी स्मारक समिती, संपर्क कार्यालय”अक्षय श्री, २१९ नारायण पेठ, केळकर रस्ता, पुणे ३०

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button