September 26, 2026

पुरुषोत्तम करंडक : अंतिम फेरीसाठी नऊ संघांची निवड

0
sanvidhan_news_150x150
Spread the love

पुणे : महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित पुरुषोत्तम करंडक स्पर्धेच्या प्राथमिक फेरीतून अंमित फेरीसाठी नऊ संघांची आज (दि.३०) निवड जाहीर करण्यात आली. शनिवार, दि. ५ व रविवार, दि. ६ सप्टेंबर २०२६ रोजी स्पर्धेची अंतिम फेरी होणार आहे.
भरत नाट्य मंदिर येथे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. दि. १६ ते दि. ३० ऑगस्ट या कालावधीत आयोजित स्पर्धेत ५१ संघांचे सादरीकरण झाले. स्पर्धेचे यंदाचे ६१वे वर्ष आहे. स्पर्धच्या प्राथमिक फेरीचे परीक्षण श्रीपाद जोशी, प्रसाद शिरगांवकर, अमृत सामक यांनी केले.

अंतिम फेरीसाठी निवडण्यात आलेले संघा पुढील प्रमाणे : महाविद्यालय आणि एकांकिका या क्रमाने..
इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजी पुणे (गॅट मॅट), मॉडर्न कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय गणेशखिंड (नातीगोती), राजर्षी शाहू अभियांत्रिकी महाविद्यालय (मुक्ताक्षरे), भारती विद्यापीठाचे फाईन आर्टस्‌ महाविद्यालय (लाजाळू), मराठवाडा मित्र मंडळाचे शंकरराव चव्हाण विधी महाविद्यालय (स्किम), सर परशुरामभाऊ महाविद्यालय (ईमान), महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे कमिन्य अभियांत्रिकी महाविद्यालय (एरर : ह्युमन डिटेक्टेड), अण्णासाहेब मगर महाविद्यालय (आठवडे बाजार), डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय आकुर्डी (इन द नेम ऑफ ह्युमॅनिटी).

उत्तेजनार्थ विद्यार्थी दिग्दर्शक : विद्यार्थी एकांकिका, महाविद्यालय या क्रमाने
निरज जोशी, स्वानंद बेहेरे (चिंता करितो विश्र्वाची , डीईएस पुणे युनिर्व्हसिटी)

उत्तेजनार्थ विद्यार्थिनी दिग्दर्शक : विद्यार्थी एकांकिका, महाविद्यालय या क्रमाने
पूजा विसपुते (काही तरी अडकलंय, श्रीमती काशिबाई नवले अभियांत्रिकी महाविद्यालय)

अभिनय उत्तेजनार्थ पारितोषिके : कलाकार, भूमिका, एकांकिका, महाविद्यालय या क्रमाने
मित कुलकर्णी (जितू, रक्षामौली, मएसो इन्स्टिट्यूट ऑफ मॅनजमेंट ॲड करिअर कोर्सेस)
अन्विता गोखले (यमुना, दानवास मान्यता नाही, बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय)
अश्र्विन ठाकूर (चोर, हॅन्डल विथ केअर?, प. भू. वसंतदादा पाटील इन्स्टिट्यूट)
प्रतिक अंदुरे (दादा, आत्मा कुडीचं भांडण, न्यू आर्टस्‌, कॉमर्स ॲण्ड सायन्स महाविद्यालय, अ. नगर)
वरदा स्वामी (निशिगंधा, निशिगंधा, गोखले राज्यशास्त्र व अर्थशास्त्र संस्था)
पूजा विसपुते (आई, काही तरी अडकलंय, श्रीमती काशिबाई नवले अभियांत्रिकी महाविद्यालय)
गौरी पुंडे (आई, कुक्कुल, मराठवाडा मित्र मंडळाचे वाणिज्य महाविद्यालय)
ऋतुजा गायकवाड (महिला सरपंच, नावापुरती. पी.डी.ई.ए. अभियांत्रिकी महाविद्यालय)
युसुफअली शेख (दादा, भिरभिर, प्रा. रामकृष्ण मोरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय)
निरज जोशी (हरी, चिंता करीते विश्र्वाची?, डीइएस, पुणे युनिर्व्हसिटी)

दर्जा खालावलेले संघ :
सिंहगड अकादमी ऑफ इजिनिअरिंग (चिन्मयी – माधव)
एमआयटी कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय (फ्लॅट क्र. ५०४)
एम.आय.ए.डी.टी. (स्टेलमेट)
मॉडर्न कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, शिवाजीनगर (अंत:करण)
डी.एच. रासयोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (अळवत)
बी.जे. मेडिकल महाविद्यालय (मनोभूमी)
फर्ग्युसन महाविद्यालय – स्वायत्त (उष:काल)
सी. ओ. ई. पी. तंत्रज्ञान विद्यापीठ (बघितलं कां?)
म.ए.सो. गरवारे वाणिज्य महाविद्यालय (निराधार)
झील अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालय (मुखवटा)

सर्वोकृष्ट विद्यार्थी लेखक : विद्यार्थी, एकांकिका, महाविद्यालय या क्रमाने
आदित्य माने (इन द नेम ऑफ ह्युमॅनिटी, डी. वाय. पाटील, अभियांत्रिकी महाविद्यालय, आकुर्डी)
सर्वोकृष्ट विद्यार्थी प्रायोगिक लेखक : विद्यार्थी, एकांकिका, महाविद्यालय या क्रमाने
निरज जोशी (चिंता करितो विश्र्वाची, डीईएस पुणे युनिर्व्हसिटी, पुणे)
उत्तेजनार्थ विद्यार्थिनी लेखिका :
अपूर्वा लबडे (मुक्ताक्षरे, राजर्षी शाहू अभियांत्रिकी महाविद्यालय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1202 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी