September 26, 2026

कलाकारांनी कलेच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे कार्य करावे – चंद्रकांतदादा पाटीलभाजपा सांस्कृतिक आघाडीच्या पुणे शहर व मतदारसंघनिहाय कार्यकारिणीची घोषणा

0
IMG-20260816-WA0056
Spread the love

पुणे : भाजपा सांस्कृतिक आघाडी पुणे शहराच्या वतीने शहर तसेच विविध मतदारसंघांतील कलाकार पदाधिकारी आणि कार्यकारिणी सदस्यांच्या पदनियुक्तीचा भव्य कार्यक्रम उत्साहात पार पडला. उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार चंद्रकांतदादा पाटील, भाजपा पुणे शहर अध्यक्ष धीरज घाटे आणि आमदार हेमंतजी रासने यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली.
यावेळी भाजपा प्रवक्ते संदीपखर्डेकर, शहर सरचिटणीस दीपक पोटे यांच्यासह भाजपा सांस्कृतिक आघाडीचे पदाधिकारी, शहर व मतदारसंघनिहाय कार्यकारिणीतील नवनियुक्त सदस्य तसेच विविध क्षेत्रांतील कलाकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, “सांस्कृतिक विभाग हा आज समाजाचा एक मोठा आरसा बनत आहे. समाजातील विचार, भावना, परंपरा आणि बदलते वास्तव कलेच्या माध्यमातून प्रभावीपणे व्यक्त होत असते. त्यामुळे कलाकारांची सामाजिक भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे.” पुण्यासारख्या समृद्ध सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा लाभलेल्या शहरात भाजपा सांस्कृतिक आघाडी हा पक्ष आणि समाज यांच्यातील महत्त्वाचा दुवा ठरत असल्याचेही त्यांनी सांगितले.
कलाकारांनी आपल्या कलेचा उपयोग केवळ मनोरंजनासाठी न करता समाजप्रबोधन, राष्ट्रनिर्माण आणि सकारात्मक विचारांच्या प्रसारासाठी करावा, असे आवाहनही चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. कला आणि संस्कृतीच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांना जोडण्याची मोठी क्षमता कलाकारांमध्ये असल्याचे त्यांनी नमूद केले.
भाजपा पुणे शहर अध्यक्ष धीरज घाटे यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे देऊन त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. पक्षाने सोपविलेली जबाबदारी प्रामाणिकपणे आणि प्रभावीपणे पार पाडत सांस्कृतिक क्षेत्रातील अधिकाधिक कलाकारांना पक्षाच्या विचारांशी जोडण्याचे आवाहन त्यांनी केले.
भाजपा सांस्कृतिक आघाडीचे पुणे शहर अध्यक्ष योगेश सुपेकर यांनी आपल्या अनोख्या आणि उत्साही शैलीत सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे प्रदान केली. सांस्कृतिक आघाडीचे पक्षसंघटनेतील महत्त्व अधोरेखित करताना त्यांनी कलाकारांना संघटित करून त्यांच्या कलागुणांना समाजोपयोगी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा संकल्प व्यक्त केला. पक्षाने आपल्यावर सोपविलेली जबाबदारी योग्य पद्धतीने कशी पार पाडावी, याबाबतही त्यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
पुणे शहरातील विविध कलाक्षेत्रांमध्ये कार्यरत असलेल्या कलाकारांना संघटनेच्या माध्यमातून एकत्र आणणे, त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणे आणि सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग वाढविणे, हा या आघाडीचा प्रमुख उद्देश असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
नवनियुक्त पदाधिकाऱ्यांमध्ये कार्यक्रमाबद्दल उत्साहाचे वातावरण होते. आगामी काळात पुणे शहरातील सांस्कृतिक क्षेत्रात विविध उपक्रम राबवून कला, संस्कृती आणि समाजप्रबोधनाच्या माध्यमातून सकारात्मक परिवर्तन घडविण्यासाठी एकजुटीने काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमामुळे भाजपा सांस्कृतिक आघाडीच्या संघटनात्मक विस्ताराला नवी ऊर्जा मिळाली असून, पुणे शहरातील कलाकारांना एक प्रभावी आणि संघटित व्यासपीठ मिळण्याचा मार्ग अधिक बळकट झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1202 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी