September 26, 2026

प्रल्हाद गवळी, प्रमोद निम्हण आणि डॉ. वैष्णवी किरड यांचा भाजपमध्ये प्रवेश

0
IMG-20260816-WA0059
Spread the love

भाजपमध्ये राष्ट्र प्रथमला सर्वोच्च प्राधान्य – ना. चंद्रकांतदादा पाटील

प्रत्येकाचा योग्य सन्मान केला जाईल – धीरज घाटे

पुणे : पुण्यातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले प्रल्हाद गवळी, प्रमोद निम्हण आणि डॉ. वैष्णवी किरड यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि भाजपचे पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या हस्ते तिघांचाही पक्षप्रवेश झाला.

यावेळी आमदार हेमंत रासने, शहर सरचिटणीस दीपक पोटे, प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर, भाजप सांस्कृतिक आघाडीचे शहराध्यक्ष योगेश सुपेकर, नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, भाजप नेते प्रकाश तात्या बालवडकर, गणेश कळमकर, लहु बालवडकर यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

पक्षप्रवेशानंतर राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी प्रल्हाद गवळी, प्रमोद निम्हण आणि डॉ. वैष्णवी किरड यांचे अभिनंदन केले. ते म्हणाले, “भारतीय जनता पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. त्यामुळे पक्षात प्रत्येक कार्यकर्त्याला योग्य सन्मान दिला जातो. स्वतःचे हित बाजूला ठेवून राष्ट्र प्रथमला सर्वोच्च प्राधान्य देणे, ही भाजपच्या कार्यकर्त्यांची भावना आहे.”

भाजपचे पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे म्हणाले, “देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली देश आणि राज्य झपाट्याने प्रगती करत आहे. त्यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून या तिघांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या पक्षप्रवेशाचा आनंद असून, त्यांचा तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांचा योग्य सन्मान राखला जाईल.”

प्रल्हाद गवळी हे मनसेच्या पुणे शहरातील पदाधिकारी म्हणून कार्यरत होते. प्रमोद निम्हण हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या माध्यमातून राजकारणात सक्रिय होते. तर डॉ. वैष्णवी किरड यादेखील शिवसेनेच्या माध्यमातून राजकीय व सामाजिक क्षेत्रात सक्रिय होत्या. या तिघांच्या भाजप प्रवेशामुळे पुण्यातील पक्षाच्या स्थानिक संघटनात्मक ताकदीत वाढ होण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1202 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी