February 10, 2026

भारतीय संस्कृती जगभर प्रसिद्ध करण्यासाठी’ फॅशन वर्ल्ड टुर”चा पुण्यातून शुभारंभ

0
IMG-20260209-WA0014
Spread the love

पुणे : भारतीय परंपरा, संस्कृती आणि वारसा जागतिक स्तरावर पोहोचविण्याच्या उद्देशाने कशिश फाउंडेशन आणि एफ स्टुडिओ इंटरनॅशनल तर्फे आयोजित ‘ फॅशन वर्ल्ड टुर”चा शुभारंभ कोथरूड , पुणे येथे करण्यात आला. या उपक्रमाच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचे सौंदर्य, परंपरा आणि पौराणिक वारसा आंतरराष्ट्रीय मंचावर सादर करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे खास आकर्षण म्हणजे ७५ पेक्षा अधिक मॉडेल्स भारतीय पारंपरिक तसेच पौराणिक वेशभूषेत सहभागी होणार असून, भारतीय परंपरा, फॅशनची वैशिष्ट्ये जगासमोर मांडली जाणार आहेत.

या प्रसंगी एमआयटी ग्रुप ऑफ इन्स्टिटय़ुशन्स पुणे चे संचालक प्रा डॉ.महेश थोरवे, डॉ.स्वप्नील कांबळे, सिद्धार्थ भोकरे, विद्या कांबळे, केतकी शिरबावीकर, अर्चना माघाडे, डॉ.स्मिता बारावकर, निलेश वावरे, अजय कांबळे , आयोजक योगेश पवार आदि मान्यवर उपस्थित होते.

या उपक्रमाविषयी बोलताना पुण्याचे पॅडमॅन आणि कशिश सोशल फाऊंडेशनचे अध्यक्ष योगेश पवार म्हणाले, ‘ फॅशन वर्ल्ड टुर”चा हा दौरा १२ देशांमध्ये आयोजित केला जाणार असून, भारतीय फॅशन आणि संस्कृतीला जागतिक ओळख मिळणार आहे. या भव्य उपक्रमामुळे भारतीय परंपरेचा ठसा आंतरराष्ट्रीय स्तरावर उमटणार असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे. ही ‘ फॅशन वर्ल्ड टुर” स्पर्धा स्वरूपाची असून त्यामध्ये किड्स, मिस, मिस्टर आदि कॅटेगरी मध्ये स्पर्धक असणार आहेत, या वर्ल्ड टुरची सुरुवात मे महिन्यात दुबई येथून होणार आहे, यावेळी स्पर्धकांना प्रोत्साहान देण्यासाठी बिग बॉस चा विजेता गौरव खन्ना उपस्थित राहणार आहे. वर्ल्ड टूर मध्ये सौंदर्य स्पर्धा, डिझायनर वॉक तशेच आंतरराष्ट्रीय अवॉर्ड असणार आहेत.

तसेच, आपल्या सामाजिक कर्तव्याच्या जाणिवेतून कशिश सोशल फाउंडेशनच्या वतीने मासिक पाळी या अतिशय महत्वाच्या आणि नाजुक विषयांवर जनजागृती करण्याचे काम केले जाते. या उपक्रमाचा भाग म्हणून सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटप करण्यात येणार आहे. फाउंडेशनच्या वतीने आजपर्यंत काश्मिर खोऱ्यासाह पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या दुर्गम भागात गरजू महिलांना सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटप करण्यात आले आहे. या शो मधूनही तीच जागृती करणार असल्याचे योगेश पवार यांनी सांगितले.

डॉ.महेश थोरवे म्हणाले, भारतीय संस्कृती आणि परंपरा यांना जागतिक पटलावर सन्मानाने प्रोत्साहित करण्यासाठी आयोजित फॅशन वर्ल्ड टूर ही एक अतिशय उत्तम संकल्पना आहे.ज्यामानिमित्ताने भारतीय संस्कृती ही दिमाखात जवळपास बारा देशांमध्ये प्रभावीपणाने प्रदर्शित केली जाईल. या उपक्रमात सहभागी सर्व स्पर्धकांना माझ्या कडून शुभेच्छा.

भारतीय संस्कृती आणि परंपरा यांना जागतिक पटलावर सन्मानाने प्रोत्साहित करण्यासाठी आयोजित फॅशन वर्ल्ड टूर ही एक अतिशय उत्तम संकल्पना आहे.ज्यामानिमित्ताने भारतीय संस्कृती ही दिमाखात जवळपास बारा देशांमध्ये प्रभावीपणाने प्रदर्शित केली जाईल. या उपक्रमात सहभागी सर्व स्पर्धकांना माझ्या कडून शुभेच्छा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी