February 10, 2026

वँडरलॅन्डे इंडिया इनोव्हेशन सेंटर’ पुण्यात; भारतातून जागतिक ऑटोमेशनला नवी दिशा

0
sanvidhan_news_150x150
Spread the love


पुणे, भारत 5 फ़रवरी 2026: लॉजिस्टिक्स ऑटोमेशन क्षेत्रातील जागतिक अग्रणी कंपनी वँडरलॅन्डे (Vanderlande) ने नुकतेच पुण्यात आपले अत्याधुनिक ‘इंडिया इनोव्हेशन सेंटर’ (IIC) चे उद्घाटन केले .
ग्राहकप्रधान्य आणि सतत नवीन्याचा शोध हेच ध्येय बाळगून काम करणाऱ्या वँडरलॅन्डे साठी ‘इंडिया इनोव्हेशन सेंटर’ (IIC) ची उभारणी हा एक मैलाचा दगड मानला जात आहे .
वँडरलॅन्डे कंपनीचे ग्राहक जगभरात पसरले आहेत. आधुनिक विमानतळ, स्वयंचलित वेअरहाऊस आणि अत्याधुनिक पार्सलसुविधा अशा ग्राहकांसाठी लागणारे ऑटोमेशन, रोबोटिक्स, Artificial Intelligence आधारित सॉफ्टवेअर तसेच इतर अत्याधुनिक उपकरणे/मशीन आणि सॉफ्टवेअर्स पुण्यात विकसित केले जात आहेत.
‘इंडिया इनोव्हेशन सेंटर’ (IIC) च्या उद्घाटनानंतर उत्पादन आणि सॉफ्टवेअर संबंधित सर्व प्रकारच्या आवश्यक चाचण्या ‘इंडिया इनोव्हेशन सेंटर’ (IIC) येथेचं करता येतील. त्यानंतर ही उत्पादने जगभर निर्यात केली जाणार आहेत.
‘इंडिया इनोव्हेशन सेंटर’ (IIC) हे अत्याधुनिक प्रशिक्षण केंद्र देखील आहे, यामध्ये वँडरलॅन्डे कंपनीच्या केवळ पुण्यातील नाही तर परदेशी इंजिनिअर/तंत्रज्ञ यांना प्रशिक्षण देण्याची सुसज्ज व्यवस्था करण्यात आली आहे
पुण्याजवळील फुलगाव येथे असलेल्या उद्योग क्षेत्रात सुमारे २ एकर वर IIC ची उभारणी झाली आहे. अत्याधुनिक IIC चालु झाल्यामुळे वँडरलॅन्डे ची पुण्यातील शाखा (GCC) हे वँडरलॅन्डे कंपनीच्या नेदरलँड मधिल मुख्यालया नंतर सर्वात मोठे तंत्रज्ञान केंद्र ठरले आहे .
‘इंडिया इनोव्हेशन सेंटर’ (IIC) हे वँडरलॅन्डेचा पुण्यातील उपलब्ध कौशल्य आणि बुद्धिमत्तेवरील विश्वास तसेच येथील दीर्घकालीन योजनांचे प्रतीक आहे.
‘इंडिया इनोव्हेशन सेंटर’ (IIC) हे सध्याच्या आणि भविष्यातील कर्मचाऱ्यांना नव्या संकल्पनांवर काम करण्यासाठी तसेच ग्राहकांसाठी आवश्यक उत्पादने व सॉफ्टवेअर विकसित करण्यासाठी प्रेरित करेल. त्याचबरोबर त्यांच्या तांत्रिक कौशल्यवृद्धीसाठीही उपयुक्त ठरेल.

“ऑटोमेशन आता पर्याय नाही, गरज आहे” — CFO, ॲस्ट्रिड व्हॅन ड्रुटेन
“आमच्या ग्राहकांसाठी ऑटोमेशन आता पर्याय न राहता गरज बनली आहे. पुण्यात सुरू झालेले IIC हे वँडरलॅन्डेच्या भविष्यातील वाटचालीसाठी भारताच्या महत्त्वपूर्ण भागीदारीचे प्रतीक आहे.
‘Everyday better’ या आमच्या मूल्यांनुसार आमच्या उत्पादन आणि सॉफ्टवेअर मधील सुधारणा आणि नवकल्पनांसाठी हे इनोव्हेशन सेंटर महत्त्वाची भूमिका बजावेल. भारतातील हे केंद्र आमच्या जागतिक इनोव्हेशन इकोसिस्टिम ला अधिक बळ देईल,” असे ॲस्ट्रिड यांनी नमूद केले.

भारतातील गुंतवणुकीवर विश्वास — व्यवस्थापकीय संचालक, श्री मनीष पाटील
“इंडिया इनोव्हेशन सेंटरचे उद्घाटन हा आमच्या (वँडरलॅन्डे -पुणे) वर असलेल्या कंपनीच्या विश्वासाचा आणि दीर्घकालीन गुंतवणुकीचा ठोस पुरावा आहे. हे केंद्र भारतीय इनोव्हेशन, कौशल्य विकास आणि जागतिक प्रकल्पांमधील आमच्या योगदानाला सकारात्मक दिशा देईल ” असा विश्वास वँडरलॅन्डे-पुणे चे व्यवस्थापकीय संचालक मनीष पाटील यांनी बोलताना दाखवला,

वँडरलॅन्डे-पुणे येथील कार्यालयाची सुरुवात २ ० ० ८ मध्ये झाली असून आज सुमारे १ ३ ० ० पेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. वँडरलॅन्डे-पुणे येथे सध्या R&D, सॉफ्टवेअर , इंजिनीरिंग अशा प्रमुख क्षेत्रामध्ये कामकाज चालते. याशिवायही कंपनीच्या इतर अनेक सेवांमध्ये (उदा . वित्त, HR , क्वालिटी ) येथील कर्मचाऱ्यांचा उल्लेखनीय सहभाग आहे . इंडिया इनोव्हेशन सेंटर (IIC) हे येथील इंजिनिअर साठी दररोज च्या कामकाजापलीकडे जाऊन नवनवीन शोध लावण्यासाठी प्रेरणादायी ठरेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी