February 10, 2026

नवनिर्वाचित महापौर मंजुषा नागपुरे, उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट 

0
IMG-20260210-WA0021
Spread the love

पुणे :
विधान भवन, मुंबई येथे आज पुणे महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित महापौर मंजुषा नागपुरे, उपमहापौर परशुराम वाडेकर आणि गटनेते गणेश बिडकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली.

या भेटीदरम्यान पुणे शहराच्या विकासाशी संबंधित विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुलजी नार्वेकर, महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकारकडून पूर्ण सहकार्य देण्याची ग्वाही दिली. पायाभूत सुविधा, नागरी सुविधा, वाहतूक व्यवस्था तसेच प्रस्तावित विकास प्रकल्पांना गती देण्यासाठी आवश्यक ती मदत करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

या प्रसंगी रिपब्लिकन पक्षाचे पुणे शहराध्यक्ष संजय सोनवणे, राज्य सचिव बाळासाहेब जानराव, भाजपचे दीपक नागपुरे उपस्थित होते. या भेटीमुळे पुणे शहराच्या विकासाला नवे बळ मिळेल, असा विश्वास नवनिर्वाचित महापौर व पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1201 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी