केंद्रीयराज्यमंत्री रामदास आठवले यांनी शरद पवार यांची भेट घेवून केली प्रकृतीची चौकशी
पुणे दिनांक 10 – राष्ट्रवादी कॉग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी दिल्लीतुन थेट पुणे गाठले. पुण्यातील रुबी रुग्णालयात जाऊन ना. रामदास आठवले यांनी खासदार शरद पवार यांची भेट घेवुन त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. यावेळी तब्येत ठीक नसतांनाही शरद पवार यांनी पार्लमेंट सुरु आहे का, याबाबत चौकशी केली. यावेळी आपली राज्यसभा चालु आहे परंतु लोकसभेमध्ये गेंधळ होत असल्याने लोकसभा सुरु नाही अशी माहिती ना. रामदास आठवले यांनी खासदार शरद पवार यांना दिली. शरद पवार यांची व्हील पॉवर मजबूत असल्याचे ना. रामदास आठवले यांनी सांगितले.यावेळी शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभाताई पवार आणि त्याची कन्या खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या.
शरद पवार यांच्या प्रकृतीची चौकशी करून निरोप घेतांना ना. रामदास आठवले यांची सुप्रिया सुळे यांच्या सोबतही चर्चा झाली. यावेळी दोन्ही राष्ट्रवादीचे विलीनीकरण होणे ही काळाची गरज आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचीही दोन्ही राष्ट्रवादीचे विलीकरण व्हावे अशी इच्छा होती. दिवंगत अजितदादा पवार यांना जर खरी श्रध्दांजली वाहायची असेल तर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस चे विलीकरण केले पाहिजे. दोन्ही राष्ट्रवादीचे विलीनीकरण करुन राष्ट्रवादी कॉग्रेसने महाराष्ट्रात महायुतीसोबत आणि देशात एनडीए सोबत आले पाहिजे असे मत ना.रामदास आठवले यांनी यावेळी व्यक्त केले.
यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देतांना ना. रामदास आठवले यांनी उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांच्या विमान अपघातामध्ये कोणताही घातपात नाही तर तो अपघातच आहे. त्यामुळे त्यावर शंका कुशंका घेणे योग्य नसल्याचे सांगत, विमान अपघाताची चौकशी सुध्दा झाली पाहिजे असे मत ना. रामदास आठवले यांनी व्यक्त केले.
वैमानिकाने बारामती येथे विमान उतरविण्यास अडचण वाटत होती तर त्याने ते विमान पुणे विमानतळावर उतरवायला पाहिजे होते. त्यामुळे तांत्रिक अडचणी काय होत्या त्यावर त्या विमान अपघाताची चौकशी झाली पाहिजे. अजितदादा पवार यांनी निवडणुकीमध्ये जे काही भ्रष्टाचाराचे आरोप केले ते पिंपरी चिंचवड महापालिकेतले होते, महायुती म्हणून आम्ही सर्व एकत्रच होतो. वरिष्ठ पातळीवर ते आरोप नव्हते. अजितदादा पवार यांच्या विमान अपघातावर घातपाताचा संशय घेण चुकीचे असल्याचे सांगत अजितदादा पवार यांच्या विमान अपघातात कोणताही घातपात नसल्याचे ना.रामदास आठवले यांनी म्हटले.
हेमंत रणपिसे
प्रसिध्दीप्रमुख
