January 19, 2026

‘प्राथमिक आरोग्य व शिक्षण सुविधांसह, वहातुक कोंडी मुक्त ‘नियोजनबद्ध विकासा’साठी काँग्रेस ऊमेदवार विजयी करा..!

0
IMG-20260112-WA0047
Spread the love
  • काँग्रेस नेते गोपाळदादा तिवारी

पुणे दि १२ –
केंद्र, राज्य व मनपा मध्ये सलग सत्तेत राहून देखील महापालिका निवडणूकीत, स्थानिक नेते सोडून मोदी-फडणवीसांची होर्डिंग लावणे, हे एकप्रकारे भाजप’च्या अपयशाची कबुली असून ‘स्मार्ट सिटी’चा बोजवारा उडाला असून, सत्ताधारी भाजपासाठी ‘मेट्रो सिटी’ची व्याप्ती केवळ एफएसआय’ची उधळण व अनियंत्रित बांधकामे करण्यापुरती असल्याचे सिद्ध होत असल्याची टिका
काँग्रेस नेते गोपाळदादा तिवारी यांनी प्रभाग क्र १२, गोलंदाज चौक, वडारवाडी, छ शिवाजी नगर येथील जाहीर सभेत बोलताना केली..!

ते पुढे म्हणाले की, स्थानिक महानगरपालिका या स्थानिक नागरिकांच्या इच्छेनुसार विकास कामे करतात.
मात्र गेली चार वर्षे निवडणुका लांबल्याने, मनपा – प्रशासकीय काळात राज्यातील सत्ताधाऱ्यांच्या दबावा खाली मनपा ने अवास्तव धोरणे राबवून, मेट्रो च्या एफएसआय’ची अवास्तव उधळण केली. मात्र मेट्रो सिटी मुळे शहराची बदलणारी व्याख्या, नागरीकरणाची वाढती घनता लक्षात न घेता विकास आराखडा (DP) व नगर नियोजना (TP) कडे पुर्णतः दुर्लक्ष केले गेले. त्यामुळेच् पुणे शहर आज ‘वहातुक कोंडी’च्या दुष्ट चक्रात अडकले आहे. नागरी वस्तीत आवश्यक ठरणाऱ्या प्राथमिक शिक्षण, आरोग्य सुविधां साठी दवाखाने, बालवाड्या, प्राथमिक शाळा, क्रीडांगणे, मातीची मैदाने वा आवश्यक उद्याने यांची पुर्णतः वानवा असुन, पर्यावरणास हानीकारक ठरणारी सिमेंट’ची जंगले उभी रहात असल्याचे ही काँग्रेस वरीष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी सांगितले.
शहरात वाढत्या नागरीकरणास आवश्यक पुरेसे रस्ते व पायाभूत सुविधांचाही अभाव असतांना, अर्थकारणाच्या चक्रात बांधकाम परवानग्या देणे मात्र थांबत नसल्याने पुणे महापालिकेत शहराच्या सर्वांगीण व पर्यावरणपुरक विकासासाठी काँग्रेस – शिवसेना आघाडीची सत्ता येणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन गोपाळदादा तिवारी यांनी केले.
यावेळी माजी गृहराज्च मंत्री रमेश बागवे, माजी आमदार दिप्ती चवधरी व ऊमेदवारांची भाषणे झाली.
प्रभाग क्र १२ मधील काँग्रेस तरूण व महीला उमेदवार ऋषीकेश जाधव, प्रियंका पवार, राजश्री अडसुळ, जावेद निलगर यांचे प्रचारार्थ सभेचे आयोजन सर्वश्री आशीश गुंजाळ, गणेश गुगळे, सुरेश जाधव, महेंद्र पवार इ नी केले. ॲड फैयाज शेख यांनी सुत्र संचालन केले.
संजय मोरे, नारायण पाटोळे, अशोक जाधव, राहुल वंजारी, बुवा कांबळे इ उपस्थित होते..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1200 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी

Call Now Button