January 20, 2026

कर्व्‍ह एएमओएलईडी डिस्प्लेसह पोको एम ८ फाईव्ह जी दाखल

0
POCO M8 image
Spread the love


पुणे ८ जानेवारी, २०२६: पोकोने आज भारतात पोको एम८ ५जीच्‍या लाँचची घोषणा केली. ज्‍यामध्‍ये दैनंदिन मनोरंजनात्मक बाबींचा समावेश आहे. पण त्याचबरोबर अपग्रेडेड फिचर्समध्ये स्लिम, वजनाने हलकी डिझाइन, सर्वोत्तम एएमओएलईडी व्हिज्‍युअल्‍स, विश्वासार्ह कार्यक्षमता आणि दिवसभर कार्यरत राहणारी बॅटरी यांचा समावेश आहे.
स्ट्रिमिंग, गेमिंग, सोशल मीडिया, फोटोग्राफी आणि दैनंदिन उत्‍पादकतेसाठी स्‍मार्टफोन्‍सवर अवलंबून असलेल्‍या वापरकर्त्‍यांसाठी डिझाइन करण्‍यात आलेल्‍या पोको एम८ ५जीमध्‍ये व्‍यावहारिक अपग्रेड्स आहेत.
या लाँचबाबत मत व्‍यक्‍त करत शाओमी इंडियाचे चीफ बिझनेस ऑफिसर संदीप सिंग अरोरा म्‍हणाले, ”पोको एम८ ५जी सिरीजमधील सर्वसमावेशक उत्‍क्रांतीचे प्रतिनिधित्व करतो. ज्‍यामधून किफायतशीर दरांमध्‍ये अर्थपूर्ण नाविन्‍यता वितरित करण्‍यावरील आमचा फोकस दिसून येतो. कर्व्‍ह एएमओएलईडी डिस्‍प्‍ले, स्लिम व सुधारित फॉर्म फॅक्‍टरसह पोको एम८ ५जी मूल्‍य व उच्‍च दर्जाच्‍या कार्यक्षमतेसंदर्भात अग्रस्‍थानी आहे. जो ग्राहकांना तडजोड न करता डिझाइन, कार्यक्षमता व प्रगत क्षमतांचे संतुलित संयोजन देतो.”
मनोरंजनात्मक बाबी
पोको एम८ ५जी भारतातील वापरकर्त्‍यांच्‍या कन्‍टेन्‍ट पाहण्‍याच्‍या पद्धती आणि दीर्घकाळापर्यंत वापराच्‍या पद्धतीला अनुसरून डिझाइन करण्‍यात आला आहे. या डिवाईसमधील ६.७ इंच फ्लो एएमओएलईडी डिस्‍प्‍लेसह १२० हर्ट्झ रिफ्रेश रेट सुलभ स्‍क्रॉलिंग व आकर्षक व्हिज्‍युअल्‍स देते. ज्‍यामुळे वापरकर्ते मनमुराद शोज, गेमिंगचा किंवा सोशल फिड्स ब्राऊज करण्‍याचा आनंद घेऊ शकतात. ३२०० नीट्स सर्वोच्‍च ब्राइटनेस आणि प्रगत डिमिंग तंत्रज्ञानासह डिस्‍प्‍ले प्रखर प्रकाशात देखील सुस्‍पष्‍ट दिसते, ज्‍यामुळे प्रवास व बाहेरील वापरासाठी हा स्‍मार्टफोन अनुकूल आहे.
ऑडिओसंदर्भात ड्युअल स्टिरिओ स्‍पीकर्ससह डॉल्‍बी अॅटमॉस® विशाल व सुस्‍पष्‍ट आवाज देते, ज्‍यामधून सुस्‍पष्‍टपणे संवाद ऐकू येण्‍याची, संतुलित मिड्स आणि चित्रपट पाहताना, व्हिडिओ कॉल्‍स करताना आणि संगीत ऐकण्‍याचा आनंद घेताना सुस्‍पष्‍टपणे आवाज ऐकू येण्‍याची खात्री मिळते.
स्लिम, वजनाने हलका आणि दैनंदिन आरामासाठी सर्वोत्तम
फक्‍त ७.३५ मिमी जाडी आणि १७८ ग्रॅम वजनासह पोको एम८ ५जी श्रेणीमधील सर्वात सडपातळ व वजनाने हलका स्‍मार्टफोन आहे, ज्‍यामुळे दीर्घकाळापर्यंत सहजपणे धरता येतो आणि एका हाताने वापरता येतो. सडपातळ असताना देखील हा डिवाईस टिकाऊपणासाठी डिझाइन करण्‍यात आला आहे. या डिवाईसमध्‍ये आयपी६६ धूळरोधक व जलरोधक आणि वेट टच टेक्‍नॉलॉजी आहे, ज्‍यामुळे ओल्‍या हाताने किंवा हलक्‍या स्‍वरूपातील पावसामध्‍ये देखील सहजपणे ऑपरेट राहण्‍याची खात्री मिळते.
टिकाऊपणा
वास्‍तविक वापरासाठी डिझाइन करण्‍यात आलेल्‍या पोको एम८ ५जी एसजीएस एमआयएल-एसटीडी-८१०एच मिलिटरी-ग्रेड टिकाऊपण प्रमाणनासह येतो, जेथे दैनंदिन ओरखडे, नकळतपणे पडणे यासंदर्भात प्रखर चाचण्‍या करण्‍यात आल्‍या आहेत. ही प्रबळ डिझाइन दररोज प्रवास करणाऱ्या आणि चालता-फिरता डिवाईसचा वापर करणाऱ्या वापरकर्त्‍यांसाठी विश्वसनीयता वाढवते.
टिकाऊ रचनेसह पोको एम८ ५जीमध्‍ये आयपी६६ धूळरोधक व जलरोधक रेटिंग आहे, जे धूळ, पाण्‍याचे थेंब व मुसळधार पावसापासून डिवाईसच्‍या संरक्षणची खात्री देते. वेट टच टेक्‍नॉलॉजी खात्री देते की, ओल्‍या हातांनी देखील डिस्‍प्‍ले प्रतिसाद देतो, ज्‍यासह बदलते हवामान व वातावरणांमध्‍ये सतत व विश्वसनीयपणे डिवाईस वापरता येतो.
दैनंदिन मल्‍टीटास्किंगसाठी सुलभ कार्यक्षमता
स्‍नॅपड्रॅगन® ६ जेन ३ मोबाइल प्‍लॅटफॉर्मची शक्‍ती असलेला पोको एम८ ५जी मॅसेजिंग व व्हिडिओ स्ट्रिमिंगपासून गेमिंग व उत्‍पादकता अॅप्‍सपर्यंत दैनंदिन मल्‍टीटास्किंग सहजपणे हाताळण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आला आहे. हा प्‍लॅटफॉर्म जवळपास ८२५,००० चे अंतूतू व्‍ही११ स्‍कोअर देतो, ज्‍यामधून दैनंदिन वापरादरम्‍यान सुलभ, प्रतिसादात्‍मक कार्यक्षमता राखण्‍याची प्‍लॅटफॉर्मची क्षमता दिसून येते.
विश्वसनीय बॅटरी क्षमता,
पोको एम८ ५जी मध्‍ये विशाल ५,५२० एमएएच क्षमतेची बॅटरी आहे, जी दिवसभर काम, मनोरंजन व संवादादरम्‍यान अधिक पॉवर देण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आली आहे. दीर्घकाळापर्यंत व्हिडिओ कॉल्‍स असोत किंवा स्क्रिनवर अधिक वेळ व्‍यतित केला जात असो हा डिवाईस कनेक्‍टेड ठेवण्‍याची खात्री देतो, जेथे सतत चार्जिंग करण्‍याची गरज भासत नाही.
चार्जिंगसंदर्भात ४५ वॅट फास्‍ट चार्जिंग कमी वेळेत डिवाईस त्‍वरित चार्ज होण्‍याची खत्री देते, ज्‍यामुळे व्‍यस्‍त, सतत कार्यरत असलेल्‍या वापरकर्त्‍यांसाठी हा डिवाईस अनुकूल आहे. या डिवाईससोबत बॉक्‍समध्‍ये ४५ वॅट चार्जर येतो, तसेच १८ वॅट रिव्‍हर्स चार्जिंग देखील आहे, ज्‍यासह चालता-फिरता इतर डिवाईसेसना चार्ज करता येते.
स्‍मार्ट कॅमेरे
पोको एम८ ५जी मध्‍ये ५० मेगापिक्‍सल ड्युअल एआय कॅमेरा सेटअप आहे, जे फोटो व आकर्षक क्षणांना कॅप्‍चर करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आले आहे. ३० एफपीएसमध्‍ये ४के व्हिडिओ रेकॉर्डिंग वापरकर्त्‍यांना सोशल मीडिया व वैयक्तिक आठवणींसाठी आकर्षक, हाय-क्‍वॉलिटी व्हिडिओज कॅप्‍चर करण्‍याची सुविधा देते.
पुढील बाजूस असलेला २० मेगापिक्‍सल सेल्‍फी कॅमेरा व्हिडिओ कॉल्‍स, सेल्‍फीज व ऑनलाइन मीटिंग्‍जकरिता अधिक सुस्‍पष्‍टता देतो.
भारतातील स्थितींसाठी डिझाइन करण्‍यात आलेला स्‍मार्टफोन
पोको एम८ ५जी ची टिकाऊपणा आणि दैनंदिन विश्वसनीयतेसाठी चाचणी करण्‍यात आली आहे, जेथे धूळ, पाण्‍याचे थेंब आणि नकळतपणे पाण्‍यामध्‍ये पडणे यांपासून संरक्षण मिळते. वजनाने हलकी रचना आणि दीर्घकाळापर्यंत टिकणाऱ्या बॅटरीसह हा डिवाईस भारतातील दैनंदिन प्रवासापासून बाहेरील क्रियाकलापांपर्यंत विविध स्थितींमधील वापरासाठी अनुकूल आहे.
शक्तिशाली डिझाइन व कार्यक्षमतेसह हा डिवाईस आऊट ऑफ द बॉक्‍स अँड्रॉईड १५ वर आधारित हायपरओएस २ वर कार्यरत आहेत, तसेच चार वर्षांचे अँड्रॉईड व्‍हर्जन अपडेट्स आणि सहा वर्षांच्‍या सिक्‍युरिटी अपडेट्सच्‍या दीर्घकालीन अपडेट कटिबद्धतेसह येतो, ज्‍यामधून काळासह सुरक्षित व अद्ययावत अनुभवाची खात्री मिळते.
किंमत व उपलब्‍धता (भारतात)
कंपनीने दिलेल्या माहितीनुसारस ६ जीबी + १२८ जीबीच्या स्मार्टफोनची लाँच किंमत १५९९९ रुपये आहे. या स्मार्टफोनची एमआरपी अंदाजे १८ ,९९९ रुपये आहे. ८ जीबी +१२८ जीबीच्या स्मार्टफोनसाठी १६,९९९ रुपये मोजावे लागतील. तर याच स्मार्टफोनचे बाजारातील मूल्य १९,९९९ रुपये आहे. तर ८ जीबी + २५६ जीबीसाठी १८,९९९ रुपये लाँन्च किंमत निर्धारित करण्यात आली आहे.वास्तविक बाजारात या स्मार्टफोनची किंमत २१,९९९ रुपये आहे. ग्राहकांना सवलतीचा लाभ घेण्यासाठी आयसीआयसीआय, एचडीएफसी व एबीआय बँक क्रेडिट आणि डेबिट कार्ड्सवर २,००० रूपयांची त्‍वरित कॅशबॅकचाही वापर करता येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1200 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी

Call Now Button