महालक्ष्मी देवीचे १०० वकिलांनी घेतले एकत्रित दर्शननवीन वर्षांची आगळीवेगळी सुरुवात ; श्री महालक्ष्मी मंदिर सारसबाग तर्फे स्वागत
पुणे : सारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी देवीचे दर्शन पुण्यातील १०० वकिलांनी एकत्रितपणे घेत नवीन वर्षांची आगळीवेगळी सुरुवात केली. श्री महालक्ष्मी मंदिर सारसबाग तर्फे पुणे बार असोसिएशनमधील या महिला वकिलांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. हेमंत झंजाड, श्री महालक्ष्मी मंदिर सारसबागच्या प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, विश्वस्त ऍड. प्रताप परदेशी यांसह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी महिला वकिलांच्या हस्ते श्री महालक्ष्मी देवीची आरती करण्यात आली.
वकिली क्षेत्रात कार्यरत असताना संपूर्ण निष्ठेने आणि सत्याची कास धरून समाजातील प्रत्येक घटकाला न्याय मिळवून देऊ, असा संकल्प यावेळी वकिलांनी केला. तसेच सर्वांना येणारे वर्ष आनंदी आरोग्यदायी जावो व सर्वांनी कायदा सुरक्षा पाळावी, अशी प्रार्थना देवी चरणी केली. श्री महालक्ष्मी, श्री महासरस्वती आणि श्री महाकाली देवीचे दर्शन उपस्थितांनी घेतले. मंदिर ट्रस्टतर्फे उपस्थित सर्व महिला व पुरुष वकिलांचा यशोचित सन्मान करण्यात आला.
- फोटो ओळ : सारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी देवीचे दर्शन पुण्यातील १०० वकिलांनी एकत्रितपणे घेत नवीन वर्षांची आगळीवेगळी सुरुवात केली. श्री महालक्ष्मी मंदिर सारसबाग तर्फे पुणे बार असोसिएशनमधील या महिला वकिलांचे स्वागत करण्यात आले.
