२०२५भारतीय संस्कृती संस्कार देणारीविश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड यांचे विचारप्रियंका बर्वे व सारंग कुलकर्णी यांच्या हस्ते एमआयटी सांस्कृतिक संध्याचे उद्घाटन
पुणे, दि. ३१ डिसेंबर : ” भारतीय संस्कृती ही संस्कार देणारी आहे. येथील सांस्कृतिक संध्या ही संगीताच्या साधनेतून शांत रसाची अनुभूती देऊन ईश्वरीय दर्शन घडते. तरूण पिढीला भारतीय संस्कृतीचा विसर पडत असतांना त्यांच्यात ही संस्कृती रुजविण्यासाठी संगीत महत्वाची भूमिका बजावतेे. नव वर्षात प्रवेश करतांना आपण संस्कृतीचे जतन करत आहोत हे अद्वितीय व आनंदाचा क्षण आहे.” असे विचार विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणेचे संस्थापक अध्यक्ष व एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड
विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे भारततर्फे लोणी काळभोर येथील विश्वराज बंधारा, विश्वशांती गुरूकुल, राजबाग येथे आयोजित केलेल्या दोन दिवसीय एमआयटी सांस्कृतिक संध्या संगीत महोत्सावाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी प्रियंका बर्वे व सारंग कुलकर्णी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच डॉ. मंगेश तु. कराड, विश्वशांती संगीत कला अकादमीच्या कार्यकारी संचालिका सौ. ज्योती कराड-ढाकणे, पं. उद्धवबापू आपेगावकर, विश्वशांती कला अकादमीचे महासचिव आदिनाथ मंगेशकर, दूरदर्शनचे माजी संचालक डॉ. मुकेेश शर्मा आणि प्रसिद्ध गप्पाष्टककार डॉ. संजय उपाध्ये उपस्थित होते.
विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले, ” संगीत साधना ही सर्व शास्त्रांमध्ये सर्वोच्च आहे. यात नाद व ताल आहे. ही संगीत साधना नसून संस्कृती आहे. भारतरत्न लता दीदी यांनी विश्वशांती संगीत कला अकादमीचे अध्यक्ष पद भूषविले होते हा आमच्यासाठी गौरवाचा क्षण होता.”
प्रियंका बर्वे म्हणाल्या,” गाण्यावर व कलेवर प्रेम करणार्यांसाठी डॉ. कराड यांनी खूप मोठे कार्य केले आहे. सांस्कृति संध्या सारखे कार्यक्रमाचे आयोजन करून येथे गायन, वादन आणि नृत्यांचा संगम घडवून आणत आहेत. वर्ष २०२५च्या शेवटाकडे जातांना आपण क्लासिकलने नव वर्षाचे स्वागत करतो हे खूप सुंदर आहे. ”
सारंग कुलकर्णी म्हणाले,” सांस्कृतिक संध्या ही संकल्पनाच युनिक आहे. एमआयटीने नव वर्षाची सुरूवात भारतीय परंपरा व संस्कृतीने करण्याचा जो पायंडा घातला आहे त्यामुळे संपूर्ण जगभरात याची नक्कीच वेगळी ओळख निर्माण होईल.”
या संगीत महोत्वसाची सुरूवात सुप्रसिद्ध शहनाई वादक तुकाराम दैठणकर यांच्या सनई वादनाने झाली. उद्घाटनानंतर अदिती रिसवडकर यांनी कथ्थक नृत्याचे सादरीकरण केले. त्यानंतर ज्येष्ठ व्हायोलियन वादक सारंग कुलकर्णी यांचे व्हायोलियन वादनाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
आदिनाथ मंगेशकर यांनी स्वागतपर भाषण केले.
सूत्रसंचालन स्नेहा वाघटकर यांनी केले. प्रा.ज्योती कराड-ढाकणे यांनी आभार मानले.
जनसंपर्क विभाग,
माईर्स एमआयटी, पुणे
