आम आदमी पार्टीकडून जयश्री डिंबळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल
प्रभाग क्र. ११ (ब) मधून महिला उमेदवारी
मतदार राजाचा सन्मान राखत, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य संकल्पनेला आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानातील मूल्यांना अनुसरून विकास करण्याचा संकल्प व्यक्त करत आम आदमी पार्टीच्या वतीने जयश्री डिंबळे यांनी आज प्रभाग क्रमांक ११ (ब) सर्वसाधारण महिला जागेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला.
रामबाग कॉलनी, शिवतीर्थ नगर, पौड रोड, कोथरूड येथील रहिवासी असलेल्या जयश्री डिंबळे यांनी आज सकाळी ११.०५ वाजता निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज अधिकृतरित्या सुपूर्द केला.
यावेळी त्यांनी स्थानिक पातळीवरील पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरवस्था, वाहतूक कोंडी, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण तसेच इतर मूलभूत नागरी सुविधांचे प्रश्न प्राधान्याने सोडवण्याचे आश्वासन दिले. सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना न्याय देत पारदर्शक व लोकाभिमुख प्रशासन देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
हॅशटॅग:
