January 19, 2026

कायनेटिक वॉट्स अँड व्होल्ट्सची जिओ थिंग्जसोबत हातमिळवणी

0
IMG-20251223-WA0011
Spread the love

भारताच्या नेक्स्ट-जेन कनेक्टेड इव्ही बनवण्यासाठी आले एकत्र

पुणे, २२ डिसेंबर २०२५: कायनेटिक इंजिनियरिंग लिमिटेडचा इलेक्ट्रिक वाहन विभाग कायनेटिक वॉट्स अँड व्होल्ट्स लिमिटेडने आज जिओ प्लॅटफॉर्मचा विभाग असलेल्या जिओ थिंग्ज लिमिटेडसोबत एक धोरणात्मक टेक्नॉलॉजी भागीदारी केल्याचे घोषित केले आहे. ही भागीदारी आगामी सर्व कायनेटिक इव्ही दुचाकी मॉडेल्समध्ये प्रगत व्हॉईस असिस्टेड कंट्रोल, आयओटी संचालित डिजिटल क्लस्टर्स आणि कनेक्टेड वाहन टेक्नॉलॉजी समाविष्ट करेल. ही भागीदारी म्हणजे भारतीय चालकांसाठी सहजप्राप्य, बुद्धिमान आणि भविष्यासाठी तत्पर मोबिलिटी अनुभव प्रदान करण्याच्या केडब्ल्यूव्ही च्या ध्येयाच्या दिशेने घेतलेली मोठी झेप आहे.

या भागीदारीच्या माध्यमातून केडब्ल्यूव्ही जिओ आयओटी द्वारे सक्षम करण्यात येणाऱ्या नवीन डिजिटल क्षमतांचा एक व्यापक संच सादर केला जाणार आहे. यामध्ये वाहनाच्या सुविधा आणि सुरक्षेसाठी व्हॉईस-असिस्टेड व्हेइकल इंटरॅक्शनचा समावेश असून, रियल-टाइम डेटावर आधारित स्मार्ट डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर्सद्वारे चालकाला अधिक अचूक आणि तत्काळ माहिती मिळेल. यासोबतच वाहनाची कामगिरी सतत तपासण्यासाठी आणि संभाव्य बिघाडांचे निदान करण्यासाठी कनेक्टेड मोबिलिटी फीचर्स उपलब्ध करून दिले जातील. प्रवास अधिक मनोरंजक आणि माहितीपूर्ण करण्यासाठी वाढीव इन्फोटेन्मेंट अॅप्लिकेशन्स देण्यात येतील, तर ताफ्याचे संचालन करणाऱ्या फ्लीट ऑपरेटर्ससाठी टेलीमॅटिक्स आणि क्लाउड-आधारित अनॅलिटिक्सच्या मदतीने कार्यक्षमता, सुरक्षितता आणि ऑपरेशनल निर्णय अधिक सक्षम होतील.

जिओ थिंग्ज एक एकत्रित ईकोसिस्टम प्रदान करते, ज्यामध्ये एज डिव्हाईसेस, कनेक्टिव्हिटी, क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर, रिमोट डिव्हाईस मॅनेजमेंट, इन्स्टॉलेशन सपोर्ट आणि आफ्टरमार्केट सेवांचा समावेश आहे. यामुळे हा जगातील एकमेव फुल-स्टॅक आयओटी प्लॅटफॉर्म ठरला आहे. कायनेटिक इव्ही मध्ये या ईकोसिस्टमच्या एकत्रीकरणामुळे व्यक्तिगत चालक आणि व्यावसायिक फ्लीट या दोहोंसाठी निर्बाध डिजिटल कनेक्टिव्हिटी शक्य होईल, तसेच यूझर अनुभव देखील लक्षणीयरित्या सुधारेल. कायनेटिक वॉट्स अँड व्होल्ट्सच्या आगामी सर्व मॉडेल्समध्ये कनेक्टेड मोबिलिटी प्लॅटफॉर्म बसवलेला असेल, ज्यामुळे ग्राहकांच्या सर्व सेगमेन्ट्ससाठी एकसमान, स्केलेबल आणि भविष्यासाठी तत्पर डिजिटल अनुभवाची खातरजमा होईल.

कायनेटिक वॉट्स अँड व्होल्ट्स लिमिटेडचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. अजिंक्य फिरोदिया म्हणाले, “कायनेटिक पहिल्यापासून गतिशीलता आणि इनोव्हेशन सर्वांसाठी उपलब्ध करून देण्याबाबत प्रयत्नशील आहे. या भागीदारीसह आम्ही ही वचनबद्धता आता डिजिटल मोबिलिटीपर्यंत नेत आहोत आणि व्हॉईस असिस्टन्स आणि कनेक्टेड फीचर्स प्रत्येक चालकापर्यंत पोहोचवत आहोत, जेणेकरून टेक्नॉलॉजी खरोखरच सहज आणि उपयुक्त बनेल. ही भागीदारी आमच्या “ईझी’ या तत्त्वाशी देखील सुसंगत आहे. हे तत्त्व ईझी की, ईझी फ्लिप आणि ईझी चार्ज यांसारख्या व्यावहारिक फीचर्समध्ये आधीपासूनच आहे आणि आता निर्बाध डिजिटल अनुभवांमुळे आणखीन मजबूत होत आहे. यामुळे आमच्या ग्राहकांसाठी मालकीचा अनुभव आणखी सुलभ झाला आहे.”

जिओ प्लॅटफॉर्म्सचे अध्यक्ष श्री. आशीष लोढा म्हणाले, “कायनेटिकसोबतच्या आमच्या सहयोगातून भारतातील समस्त ऑटोमोटिव्ह सेक्टरमध्ये कनेक्टेड ईकोसिस्टम उभारण्याचे आमचे व्हिजन प्रतिबिंबित होते. जिओच्या व्हॉईस असिस्टन्स आणि आयओटी क्षमता दुचाकी सेगमेन्टमध्ये आणून आम्ही केवळ ही वाहने अपग्रेड करत नाही आहोत, तर आम्ही माणूस आणि यंत्र यांच्यातील इंटरॅक्शनची नव्याने व्याख्या करत आहोत आणि स्मार्ट मोबिलिटीचे लाभ प्रत्येक भारतीय चालकापर्यंत पोहोचवत आहोत.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1200 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी

Call Now Button