January 19, 2026

सुट्टीचा मुहूर्त साधून भीमथडी ओसंडून वाहिली- पुणेकरांनी मारला मांसाहारी शाकाहारी जेवणावर ताव.

0
IMG-20251221-WA0024
Spread the love

पुणे. ता.22 डिसेंम्बर:- रांगेत उभे राहून जेवण घेणे काय असते हे पुणेकराकडून शिकावे, आशा पद्धतीने पुणेकरांनी काल कोल्हापुरी मटण, कोकणी फिश, मासवडी, मिलेट कॅफे अशा विविध स्टॉल समोर रांगा लावून जेवण घेतले. दिनांक 20 डिसेंबर पासून सुरू झालेल्या भीमथडी जत्रेचा कालचा दुसरा दिवस. मार्गशीर्ष महिना संपल्यानंतरचा पहिला रविवार असल्याने पुणेकरांनी प्रचंड गर्दी केली.व्हेज – नॉन व्हेज विभागात मटण थाळी, गावरान चिकन थाळी, चिलापी थाळी, सुका बोंबील, खेकडा थाळी, बिर्याणी, कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा, व्हेज नगेट्स,उकडीचे मोदक, दही धपाटे,रगडा पापड, वांगे भरीत,थालीपीठ, गव्हाचे मोदक,काळा घेवडा आमटी,पुरण पोळी, मासवडी,कोळंबी फ्राय, लालमाठ,रानभाजी थाळी, खापरावरचे मांडे, खपली गहू खीर, व्हेज बिर्याणी, उंबर थाळी, खरवस, गव्हाचा चिक, इत्यादी खाद्य पदार्थ उपलब्ध आहेत.

भीमथडी सिलेक्स्टमध्ये देशाच्या वेगवेगळ्या राज्यातून आलेल्या कलाकुसरिच्या विविध वस्तू विक्रीस उपलब्ध असून यामधील मिलेट कॅफेने गर्दी खेचली आहे. यामध्ये नाचणी इडली, ज्वारीची चवदार भेळ, राव्याची लापशी व पुलाव, नाचणी क्रीम रोल, गुळाचा चहा मिळत आहे. यातीलच अंडीज टी शर्ट विभागात शाळकरी मुलांनी सुट्टीच्या दिवसात स्वतः बनविलेले 150 प्रकारचे टी शर्ट व उटणे विक्रीस उपलब्ध आहे. टी शर्ट विक्रीतून मिळणारा निधी ही मुले धर्मदाय पशु सेवा केंद्राला भेट म्हणून देणार आहेत.

या वर्षी भीमथडीत प्रवेश केल्याबरोबर मुगल गार्डन लक्ष वेधून घेते. त्याच्या बाजूलाच कलाकारांनी काढलेल्या रांगोळी “प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण ठरत आहेत. १२ व्या शतकातील महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या ‘बलुतेदार पद्धतीवर आधारित माहितीपूर्ण रांगोळ्यांचे सादरीकरण*.
या कलाकृतींमधून गावातील १२ सेवाभावी समुदायांच्या भूमिका आणि त्यांना धान्याच्या स्वरूपात मिळणारा मोबदला (बलुता) यांचा इतिहास मांडण्यात आला आहे. या रांगोळ्यांद्वारे लोहार, कुंभार, चांभार, सोनार आणि शिंपी (दर्जी) यांच्या कारागिरीचा, तसेच न्हावी, माळी, पुरोहित आणि ग्राम सेवक (महार) यांच्या महत्त्वपूर्ण सेवेचा गौरव करण्यात आला. यामध्ये केवळ इतिहास न मांडता २१ व्या शतकात या व्यवसायांचे झालेले आधुनिक रूपांतर—जसे की फॅशन डिझायनिंग, लँडस्केपिंग, मशिनरी आणि सुरक्षा सेवा इत्यादी अतिशय प्रभावीपणे दर्शविण्यात आले आहे.” हे रांगोळी प्रदर्शन पाण्यासाठी प्रेक्षक गर्दी करत आहेत.

*या वर्षी शेतकरी दालनात जी आय मानांकन असलेले विवध पदार्थ* पुणेकरांसाठी उपलब्ध असून त्यामध्ये हळद, अंजीर व अंजीर प्रक्रिया उत्पादने, लाल पेरू, लाल व निळी केळी, अंबाडी, सीताफळ, आंबा-जांभूळ लस्सी, कोल्हापूर - पुणे - सातारा येथील सेंद्रिय गुळ, खरवस, देशी व विदेशी गाई तूप, चीज पणीर, लाकडी घाणा तेल, आलेपाक, कडधान्य, घेवडा, डाळी, भरड धान्य, मिलेट ढोकळा, स्ट्रॉबेरी चॉकलेट, आदिवासी भागातील इंद्रायणी, आंबेमोहर, बासमती, काळा - लाल तांदूळ, हातसडी तांदूळ, 18 प्रकारचे थालीपीठ, विविध प्रकारचे इडली पिठे, शेवया, मध, जगातील पहिला बिनसाखरेचा गोड चहा,  दीडशे प्रकारचे देशी बियाणे इत्यादी प्रकारचे वाण उपलब्ध आहेत.

जास्तीत जास्त पुणेकरांनी भिमथडीला भेट द्यावी असे आयोजकांतर्फे आवाहन करण्यात येत आहे www.bhimthadijatra.com या वेबसाईटवर पुढील 4 दिवसाचे ऑनलाईन तिकीट बुक करता येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

महत्त्वाच्या बातम्या

🔔 अपडेटसाठी सबस्क्राइब करा 👥 1200 Subscribers
×

सबस्क्राइब करा

दररोजच्या ताज्या बातम्यांसाठी

Call Now Button