आशियाई व आफ्रिकन देशांतील प्रतिनिधींची ग्राहक पेठेस भेटआंतरराष्ट्रीय सहकार वर्ष २०२५ च्या निमित्ताने आशियाई व आफ्रिकन देशांसाठी आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत भेट ; सहकारी चळवळ व ग्रामीण वित्त क्षेत्रात आंतरदेशीय अनुभव व ज्ञानाची देवाणघेवाणपुणे : वैकुंठ मेहता नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ को-ऑपरेटिव्ह मॅनेजमेंट (व्हॅम्निकॉम) यांच्या वतीने एएआरडीओच्या सहकार्याने, आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष २०२५ च्या निमित्ताने आशियाई व आफ्रिकन देशांसाठी आंतरराष्ट्रीय सहकार कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून पुणे येथील ग्राहक पेठेला अभ्यास भेट देण्यात आली.
ग्राहक पेठेचे व्यवस्थापकीय संचालक सूर्यकांत पाठक यांनी आंतरराष्ट्रीय शिष्टमंडळाचे स्वागत केले. यावेळी त्यांनी ग्राहक पेठेचे तत्त्वज्ञान, कार्यपद्धती, सहकारी मूल्ये तसेच आधुनिक व्यवस्थापन प्रणालीबाबत सविस्तर माहिती दिली.
या कार्यक्रमामध्ये भारतासह एएआरडीओ-भारत, इस्वाटिनी, गांबिया, घाना, जॉर्डन, केनिया, लेबनॉन, लायबेरिया, मलेशिया, मॉरिशस, मोरोक्को, नामिबिया, नायजेरिया, ओमान, श्रीलंका आणि झांबिया येथील ५० प्रतिष्ठित नेते व धोरणकर्त्यांनी सहभाग घेतला. सहकारी चळवळ व ग्रामीण वित्त क्षेत्रात आंतरदेशीय अनुभव व ज्ञानाची देवाणघेवाण करण्यासाठी हे एक महत्त्वाचे व्यासपीठ ठरले.
आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींनी ग्राहक पेठेतील आधुनिक व्यवस्थापन प्रणाली, डिजिटल तंत्रज्ञानाचा नाविन्यपूर्ण वापर याचे विशेष कौतुक केले. ग्राहक पेठ ही सहकारी व शहरी वित्त परिसंस्थेतील एक आदर्श संस्था असल्याचे मत शिष्टमंडळातील सदस्यांनी व्यक्त केले. या भेटीमुळे डिजिटल परिवर्तन, पारदर्शक व्यवस्थापन व सहकारी संस्थांमधील सर्वोत्तम पद्धती यावर महत्त्वपूर्ण विचारांची देवाणघेवाण झाली. त्यामुळे या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमाचा शिकण्याचा अनुभव अधिक समृद्ध झाल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
- फोटो ओळ : वैकुंठ मेहता नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ को-ऑपरेटिव्ह मॅनेजमेंट (व्हॅम्निकॉम) यांच्या वतीने एएआरडीओच्या सहकार्याने, आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष २०२५ च्या निमित्ताने आशियाई व आफ्रिकन देशांसाठी आंतरराष्ट्रीय सहकार कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून पुणे येथील ग्राहक पेठेला अभ्यास भेट देण्यात आली.
