हनुमान नगरातील पारखे कॉर्नर येथे संविधान दिन उत्साहात साजरा
आंबेगाव खुर्द प्रतिनिधी
आंबेगाव खुर्द येथील हनुमान नगर, जांभूळवाडी रोडवरील पारखे कॉर्नर बिल्डिंग टेरेस येथे विश्वरत्न फाउंडेशन तर्फे संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. भारतीय संविधानाचे महत्व आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाची प्रस्तावना नरेंद्र पारखे यांनी केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मधुकर जाधव यांनी केले.
सर चंद्रदीप अर्जुन मुजमुले (M.A., MSW, SET, M.Phil – Psychiatric Social Work)
यांनी संविधानातील मूल्ये व नागरिकांच्या जबाबदाऱ्यांवर प्रभावी मार्गदर्शन केले.
प्रा. आनंद जेठे (जेठेज अकॅडमी, पुणे — राज्यपाल पुरस्कार व महात्मा फुले शिक्षण प्रेरणा पुरस्कार प्राप्त)
यांनी संविधान निर्मिती, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान आणि आधुनिक समाजातील संवैधानिक मूल्यांची गरज यावर विचार मांडले.
कार्यक्रमात पुढील मान्यवरांनी उपस्थिती लावली—
आनंद ओव्हाळ विजय ओव्हाळ फुले शाहू आंबेडकर प्रतिष्ठान सुनील चव्हाण मधुकर लोखंडे, सुभाष खडसे, अस्मिता पारखे, कीर्ती खडसे.
महिला मान्यवर —
प्रियंका कांबळे, अरुणा जाधव, नीलम शेलार, पुष्पा रोकडे, रूपाली ओव्हाळ, अंकिता सावंत, आम्रपाली भोळे, वंदना लोखंडे, वैशाली जेधे जयश्री प्रधान, मयुरी खिराडकर मुल्ल भाभी, नंदा रोकडे, मधु बिराजदार.
इतर उपस्थित मान्यवर —
अनुप सर, रवी जाधव, आनंद ओव्हाळ, आसाराम वक्ते, दिगंबर सोनाळे, सुनील कांबळे, प्रभाकर सोनाळे, मंदिप साळवे
विश्वरत्न फाउंडेशनचे पदाधिकारी, सभासद व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात संविधान दिनाचे औचित्य आणि सामाजिक एकात्मतेची भावना पसरली होती.
कार्यक्रमाच्या शेवटी नरेंद्र पारखे यांनी सर्वांचे आभार मानून संविधान जागृतीचे कार्य अधिक व्यापक करण्याचा संकल्प व्यक्त केला.
