खासदार क्रीडा महोत्सव…हा एक एव्हेंटच ….
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात खासदार क्रीडा महोत्सव संपन्न झाला एकार्थी चांगली बाब आहे… परंतु गेली 12 ते 15 वर्षे लोटली म्हणजे 2014 पासून आम्ही क्रीडा समन्वय समितीच्या माध्यमातून पुणे महानगर पालिकेच्या शाळांची मैदाने पूर्वी प्रमाणेच अल्पदरात आमच्या विविध क्रीडा क्षेत्रातील संघटनांना मिळावी म्हणून मुख्यमंत्री पासून सर्वच संबंधित मंत्री महोदयांना व तत्कालीन आयुक्तांना वारंवार पत्र लिहिले,आंदोलनही केले परंतु आजतागायत कोणीही कधीही आमच्या या मागणीकडे विशेष म्हणजे पुणे शहरातील विविध क्रीडा क्षेत्रातील असंख्य खेळाडूंच्या भवितव्यासाठी कसलीही स्पष्ट परखड भूमिका घेतली नाही ज्यामुळे आजही पुणे शहरातील विविध खेळाडू आपापल्या क्रीडा क्षेत्राचा सराव करण्यासाठी जागा शोधतोय ही आपल्या पुण्य क्रीडा नगरीची शोकांतिकाच आहे .तसेच अनेक क्रीडा संघटनाचे वर्षानुवर्षे न्यायालयात वाद सुरू आहेत तेही कधी या सरकारकडून मिटवण्याचा प्रयत्न झाला नाही, अनेक क्रीडा प्रकाराच्या प्रमाणपत्र पडताळणीतील काही जाचक अटी रद्द केल्या जात नाही तसेच सदर पडताळणी शासनाकडून वेळेवर होत नाही त्यामुळे खेळाडूंना प्रमाणपत्र पडताळणी करण्यासाठी मानसिक,आर्थिक आणि शारीरिक त्रास होत असून अनेकांना आलेली सरकारी नोकरीची संधी गमवावी लागते …या अशा अनेक गंभीर घटना व अनागोंदी कारभार राज्याच्या क्रीडा विभागात चालू असून खासदारांनी केवळ क्रीडा क्षेत्राचा इव्हेंट न करता खेळाडूंचे मूलभूत प्रश्न सोडवावेत जेणेकरून खेळाडूंना न्याय मिळेल आणि पुणे ही क्रीडानगरी म्हणून भरारी घेईल…
क्रीडा क्षेत्रातील संघटनांना त्यांच्या हक्काचा न्याय द्यावा, क्रीडा क्षेत्राचा योग्य दिशेने प्रचार प्रसार व्हावा,म्हणजेच खासदार क्रीडा महोत्सव याला अर्थ प्राप्त होईल…
आपले, लतेंद्र भिंगारे, अध्यक्ष क्रीडा समन्वय समिती महाराष्ट्र राज्य…
